मेष - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण - घेवाण करू नका. शारीरिक व मानसिक बेचैनी राहील. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील.
वृषभ - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान - सन्मान मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील.
मिथुन - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्या कडून लाभ होईल. सरकारी काम पूर्ण होण्यात अडचणी येणार नाहीत. दांपत्य जीवनात सुख, आनंद मिळेल.
कर्क - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल. कुटुंबीय व वरिष्ठ ह्यांच्यासह दिवस सौख्यदायी होईल. नोकरीत सुद्धा लाभ होतील.
सिंह - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. कुटुंबियांशी मतभेद होतील. अवैध कामामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे. योग्य मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्न करा.
कन्या - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज दांपत्य जीवनात सुखद क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल. भिन्नलिंगी व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल. व्यापारात भागीदारांशी चांगले संबंध राहतील. धनलाभ होईल.
तूळ - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल व सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी मित्रांचा सहवास घडेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात कराल.
वृश्चिक - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
धनू - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल. प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाईल. तार्किक व बौद्धिक चर्चे पासून शक्यतो दूर राहा.
मकर - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. मनःस्ताप व प्रतिकूल वातावरणामुळे दिवस कटकटीचा जाईल.
कुंभ - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोट्या प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
मीन - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी भेट - संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. प्रवासाची शक्यता आहे. तन-मनाने प्रसन्न राहाल.