ETV Bharat / bharat

10 सप्टेंबर राशीभविष्य : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'हे' शुभकार्ये घडतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - horoscope for the day 10 september

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

horoscope
horoscope
author img

By

Published : Sep 10, 2021, 12:01 AM IST

मेष - आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानि वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे.

वृषभ - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील.

मिथुन - आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख - शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. उत्तम भोजन व वैवाहिक सुख मिळेल.

कर्क - आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. जलाशया पासून दूर राहावे.

सिंह - आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी - पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदित करेल. प्रेमपूर्ण संबंधाचे महत्व लक्षात येईल. आर्थिक लाभ होईल.

कन्या - कौटुंबिक सुख - शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आयात - निर्यात व्यापारात चांगले यश मिळेल. परंतु वाद - विवाद, चर्चा ह्यात उग्रता दाखवू नका.

तूळ - सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. मौज - मस्ती व मनोरंजनावर खर्च कराल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.

वृश्चिक - आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. कुटुंबीय व स्नेही यांच्याशी पटणार नाही.

धनू - आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख - शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील. मित्रांसह एखाद्या पर्यटनाचा बेत ठरेल. उत्तम भोजन प्राप्ती मुळे आनंद वाटेल.

मकर - आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते. सरकार, मित्र किंवा संबंधितां कडून फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. संततीची प्रगती पाहून आनंदित व्हाल.

कुंभ - शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मौज - मस्ती हिंडण्या - फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील. विदेशातून आनंददायी बातम्या येतील. संतती विषयक समस्या सतावेल. प्रतिस्पर्ध्यांशी जास्त वादविवाद करू नका.

मीन - आज अवैध कामा पासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्‍या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. आपणास योग्य दिशा सापडण्यासाठी प्रयत्न करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.