ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या स्त्रियांना माहेरवरुन मिळेल चांगली बातमी, कार्य सफल होईल, वाचा राशी भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 21 मार्चच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 20, 2023, 6:20 PM IST

Updated : Mar 21, 2023, 6:29 AM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 21 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

  • मेष : आज तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून काळजीपूर्वक व्यवहार करा. विवाहेच्छुकांचे विवाह जुळून सामाजिक क्षेत्रात यशासह प्रसिद्धी मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र सावध राहा. एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल मात्र दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता राहणार नाही. प्रकृती बिघडण्याची शक्यता असून स्वकीयांशी मतभेद होऊ शकतात.
  • वृषभ : आजचा दिवस तुम्हाला शुभ आणि फलदायी असून व्यावसायिक स्थितीही अनुकूल राहील. तुमच्या कामाचे योग्य कौतुक होऊन समाजात मान मरातब वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात आनंद दरवळणार असून नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीचे आयोजन करू शकाल.
  • मिथून : आज प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होऊन व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असून दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक दृष्टया अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश झाल्याने धनप्राप्ती संभवते.
  • कर्क : आज अवैध्य आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे चांगले राहील. वाणीवर संयम ठेवण्याची गरज असून कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. दुपारनंतर एखादी चांगली बातमी मिळू शकते, मात्र संतती विषयक चिंता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी झालेल्या वादामुळे आपल्या मनाला दुःख होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हिताचे राहील.
  • सिंह : आज आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही प्रसन्न आणि आनंदित राहण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबत फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा होऊ शकेल. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होऊन दुपारनंतर मात्र मानसिक नैराश्य जाणवू शकते. संतापाची भावना वाढून कुटुंबात वादविवाद होऊ नयेत यासाठी तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासून मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
  • कन्या : आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहण्याची शक्यता असून कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होईल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवून घरात सुखशांती नांदेल. प्रत्येक कामातून दृढ मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येण्याची शक्यता असून प्रवास संभवतो.
  • तूळ : आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असणार आहात. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नसून आज शक्यतो प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता असून दुपारनंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्हाला यश आणि कीर्ती प्राप्त होऊ शकते. व्यवसायात चांगले सहकार्य लाभून कौटुंबिक वातावरण आनंददायी राहणार आहे.
  • वृश्चिक : आजचा दिवस विद्यार्थ्यांना अभ्यास आणि यश मिळवण्यास अनुकूल दिवस आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटून मन प्रसन्न होणार आहे. आज नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने यावर जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याने आर्थिक योजना सहजपणे राबवू शकाल. दुपारनंतर वैचारिक स्थैर्य राहणार नसल्याने आज नवीन कार्य हाती घेणे चांगले राहणार नाही.
  • धनू : आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार असून कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र आणि स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक दृष्टया आपण बेचैन राहण्याची शक्यता असून सौंदर्य प्रासधने, गृहसजावट व मनोरंजनाची साधने खरेदी करू शकाल. स्थावर मालमत्तेविषयक कागद पत्रांवर सही करताना काळजी घ्यावी लागेल, धोका होण्याची शक्यता आहे.
  • मकर : आज वाद होण्याची शक्यता असून एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. दुपारनंतर मन चांगले राहून शारीरिक स्वास्थ्य मिळेल. नशिबाची साथ मिळल्याने एखादा प्रवास घडू शकतो. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मनाला आनंद वाटेल, त्यामुळे ताजेतवाने व्हाल.
  • कुंभ : आज आपले मन आनंदी राहिले तरी, मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उद्भवल्याने निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. तुम्ही केलेल्या कामाकडे कोणीही लक्ष न दिल्याने तुम्हाला नैराश्य येऊ शकते. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येू शकतात, त्यामुळे जपून निर्णय घ्यावा लागेल.
  • मीन : आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नसून आज वाद होण्याची शक्यता आहे. मन एकाग्र होण्यात अडचणी येऊन आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल, मात्र दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होणार आहे. मित्रांकडून भेटवस्तू आणि कुटुंबीयांकडून सुख मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Last Updated : Mar 21, 2023, 6:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.