मेष : सूर्याचे मिथुन राशीतील गोचर आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. नोकरीत आपली उन्नती सुद्धा होऊ शकते. पित्याशी सुद्धा संबंधात सुधारणा होईल. गुंतवणुकी संबंधित एखादा निर्णय सुद्धा घेऊ शकाल. उपाय:-गायत्री चालिसाचे पठण करावे.
वृषभ : सूर्य मिथुनेत गेल्या पासूनचा एक संपूर्ण महिना आपण कुटुंबियांच्या सहवासात जास्तीतजास्त वेळ घालवाल. नेत्र विकार सुद्धा संभवतात. वाहन इत्यादींचा उपयोग सुद्धा जपून करावा. उपाय:-रविवारी उपवास करून सूर्याची आराधना करावी.
मिथुन : आता सूर्य एक महिना आपल्या राशीत राहणार आहे. हा संपूर्ण महिना आपणआत्मविश्वासाने राहू शकाल. असे असले तरी वैवाहिक जोडीदाराशी आपले विचार जुळणार नाहीत.व्यावसायिक भागीदाराशी सुद्धा काही वाद संभवतात. उपाय :-गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा.
कर्क : सूर्याचे मिथुन राशीतून भ्रमण असता धन संग्रह करण्याची आपली वृत्ती वाढेल. पैतृकसंपत्तीशी संबंधित विवाद संपुष्टात येण्याची संभावना आहे. आपण काहीतरी नवीन करण्याची योजना सुद्धा आखाल. उपाय:-रोज सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याचा अर्घ्य द्यावा.
सिंह : सूर्य मिथुनेत आल्याने आपल्यासाठी सामान्याहून चांगले राहील. अनेक मोठ्याअधिकाऱ्यांशी सुद्धा आपले संपर्क होतील. ह्या दरम्यान आपण समाजात खूप सन्मानित व्हाल.नवीन मैत्री होईल.उपाय:-सूर्याच्या बारा पवित्र नावांचा जप रोज करावा.
कन्या : सूर्य मिथुन राशीत आल्यापासून एक महिना आपणास थोडे सावध राहावे लागेल. नोकरीकरणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना चांगला आहे. काहीजणांना रोजगाराची नवीन संधी सुद्धा मिळूशकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. उपाय:-शिव पंचाक्षर मंत्राचा जप करून सूर्यास अर्घ्य द्यावा.
तूळ : सूर्याचे मिथुन राशीतील भ्रमण आपल्या पराक्रमाची वृद्धी करेल. जास्त यशमिळविण्यासाठी आपणास अतिरिक्त कष्ट करावे लागतील. प्रवासाचा बेत सुद्धा ठरवू शकता. हेगोचर असताना वडिलांचा सल्ला आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.उपाय:-सूर्याष्टकाचे पठण आपणास लाभदायी होईल.
वृश्चिक : सूर्याचे मिथुन राशीतील भ्रमण आपल्यासाठी थोडे त्रासदायी होऊ शकते. ह्या पूर्णमहिन्यात आपण वाहन किंवा इलेक्ट्रिक उपकरणांचा उपयोग काळजीपूर्वक करावा. सासुरवाडीकडील लोकांशी सुद्धा अत्यंत सावधपणे संवाद साधावा. उपाय:-रोज सूर्यास अर्घ्य द्यावा. दुर्गा चालिसाचे पठण करावे.
धनु : मिथुन संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी विवाद निर्माण करणारा होऊ शकतो.वैवाहिक जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदार यांच्याशी मतभेद संभवतात. ह्या दरम्यानआपणास धीर धरावा लागेल. आपले विचार इतरांवर लादू नका. उपाय:-रविवारी भगवान शंकरास जलाभिषेक करावा व गुळाचे दान द्यावे.
मकर : सूर्याचे मिथुन राशीतून भ्रमण होत असताना आपणास कोर्ट - कचेरीशी संबंधित कार्यातयश मिळू शकते. ह्या दरम्यान आपण विरोधकांवर मात कराल. आपले आरोग्य उत्तम राहील. असेअसले तरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा जास्त कष्ट करावे लागतील. उपाय:-रोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
कुंभ : सूर्याचे मिथुन राशीतील भ्रमण आपल्यासाठी सामान्यच राहील. ह्या संपूर्ण महिन्यातशिक्षण व संतती संबंधी चिंता होऊ शकते. प्रणयी जीवनात अहंकारामुळे आपले नुकसान होऊशकते.उपाय:-रोज सूर्यासकुंकू मिश्रित पाण्याचा अर्घ्य द्यावा.
मीन : सूर्याचे मिथुन राशीतील भ्रमण आपल्यासाठी संतोषजनक होईल. घरी आपणास काह महत्वाची कामे करावी लागू शकतात. मातेच्या प्रकृतीत सुधारणा होईल. एखादे नवीन वाहन खरेदी करण्याचा बेत ठरवू शकता. असे असून सुद्धा महिन्याच्या अखेरीस काही चिंता आपणास सतावू शकतात. उपाय:-रोज वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत.
हेही वाचा :
Horoscope : या राशींच्या व्यक्तींची व्यवसाय वाढवण्याची योजनाही पुढे सरकेल, वाचा राशीभविष्य
Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
Love horscope : या राशींच्या व्यक्तींचे जोडीदारासोबतचे जुने मतभेद दूर होतील; वाचा लव्हराशी