पुणे - मीन राशीसाठी हे वर्ष नेहमीपेक्षा उत्तम असणार आहे. हे वर्ष करियरच्या दृष्टीने तारकाप्रमाणे चमकणारे असेल. आपण कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम करून आपली प्रतिमा सुधारण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ मिळेल. आपल्या राशीवर पडणारा गुरूचा प्रभाव काही प्रमाणात त्रास देऊ शकतो. वर्षाच्या मध्यात सुख-सोयीं मध्ये वाढ होईल.
करिअर आणि शिक्षण कसे असेल? -
विद्यार्थ्यांना या वर्षी विविध संधी चालून येतील त्या ओळखा आणि पुढे जा प्रत्येक संधीच सोन करा. मीन राशीच्या लोकांना करिअर क्षेत्रात सामान्यपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात, मागील वर्षात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळू शकते. मार्च-एप्रिल महिन्यात काही लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कुंभ राशीत शनीच्या प्रवेशानंतर तुम्ही कार्यक्षेत्रातील प्रत्येक काम सावधगिरीने करा, अन्यथा तुमच्यावर वाईट परिस्थिती येऊ शकते. व्यावसायिकांसाठी वर्ष चांगले आहे. या वर्षी बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक जीवन -
आर्थिकदृष्ट्या, मीन राशीचे लोक २०२२ मध्ये पूर्वीपेक्षा थोड्या चांगल्या स्थितीत असतील. तसेच, वर्षाच्या मध्यात तुम्हाला अवांछित खर्चांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या काळात गुंतवणुकीतही काळजी घ्या, विचार न करता गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. मीन राशीच्या काही लोकांना या वर्षी आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच योग्य अर्थसंकल्पाचे नियोजन केल्यास ते चांगले होईल.
आरोग्य कसे असेल? -
मीन राशीच्या लोकांना आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. या वर्षी बाराव्या स्थानी शनीचे संक्रमण असल्याने आरोग्याच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. या राशीच्या लोकांनी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. योग्य आहाराने तुम्ही स्वतःला निरोगी ठेवण्यात यशस्वी होऊ शकता. वर्षाच्या मध्यात मानसिक तणाव असू शकतो. त्यामुळे यावेळी प्राणायाम करणे तुमच्यासाठी योग्य राहील. एकंदरीत, वर्ष २०२२ मध्ये मीन राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कौटुंबिक जीवन कसे असेल? -
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात संमिश्र राहील. या काळात या राशीच्या काही लोकांना कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. जर मुलं लग्नायोग्य असतील तर त्यांच्या लग्नाचा निर्णय नीट विचार करूनच घ्यावा. त्यामुळे निर्णय क्षमतेवर थोडा परिणाम होऊ शकतो. वर्षाच्या मध्यात मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुसंवाद दिसून येईल. या दरम्यान मीन राशीचे काही लोक कुटुंबियांसह धार्मिक प्रवासाला जाऊ शकतात. काही लोकांना भावंडांच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. तुम्ही संभाषणात शब्दांचा वापर हुशारीने करावा.
प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असेल? -
मीन राशीच्या लोकांना या वर्षी प्रेम-जिवनामध्ये संमिश्र परिणाम मिळतील. या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवू शकता. परंतु वर्षाच्या मध्यात तुमच्यामुळे जोडीदाराच्या मनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्ही बरोबर असाल तर वाद घालण्याऐवजी त्यांना तुमचे मुद्दे योग्य पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जूननंतरचा काळ या राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनासाठी सुवर्ण काळ असू शकतो. या वर्षी मीन राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात संतुलन आणण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागण्यात बदल करावा लागेल. जरी वर्षाचे सुरुवातीचे महिने वैवाहिक जीवनासाठी चांगले असू शकतात. परंतु त्यानंतर तृतीय व्यक्तीमुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. जर तुम्हाला समतोल राखून चालायचे असेल तर तिसऱ्या व्यक्तीचे म्हणणे न मानता तुमचे शब्द तुमच्या जोडीदारासमोर ठेवा. त्यामुळे परिस्थिती सुधारेल.