ETV Bharat / bharat

Horoscope 2022 Aquarius : कुंभ राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य - राशीभविष्य 2022

नवं वर्ष कुंभ राशीसाठी कसं असेलं? ( How Will be new year for Aquarius ) वैवाहिक जीवन कसे असेल? (2022 Maried Life For Aquarius ) या वर्षात आर्थिक लाभ होईल का? कौटुंबिक स्थिती कशी असेल? शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल की नाही? जाणून घ्या, राशीभविष्य 2022 (Horoscope 2022)

Horoscope 2022 Aquarius
Horoscope 2022 Aquarius
author img

By

Published : Dec 30, 2021, 9:54 AM IST

पुणे - हे वर्ष या कुंभ राशीच्या जातकांसाठी साधारणपेक्षा ( How Will be new year for Aquarius ) उत्तम असणार आहे. या वर्षात करिअरमध्ये मिळणारे यश आणि आपले परिश्रम आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे. वर्षांच्या सुरुवातीचे चार महिने राशी स्वामी शनी स्व राशीत गोचर करणार आहे. यामुळे निर्णय क्षमता चांगली असेल. या शिवाय या राशीच्या जातकांना समाजातील काही महत्वपूर्ण परिस्थितीला सामोरी जावे लागणार.

कुंभ राशीभविष्य

करिअर आणि पैसा मिळेल का? -

नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष आनंददायी ठरू शकते. यावर्षी तुमची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांनाही यावर्षी रोजगार मिळू शकतो. गेल्या वर्षी तुमच्या करिअर क्षेत्रात आलेल्या अडचणीही दूर होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही सहकाऱ्यांशीही मैत्रीपूर्ण वागाल, त्यामुळे सहकारीही तुम्हाला सहकार्य करतील. तुमची कोणतीही कल्पना कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम करू शकते. या राशीच्या व्यावसायिकांबद्दल सांगायचे तर, या वर्षी तुम्ही जास्त धोका पत्करणे टाळावे. तसेच, व्यावसायिकांना या वर्षाच्या मध्यात सुज्ञ गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतो. जे लोक वडिलोपार्जित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी २०२२ हे वर्ष शुभ राहील. या वर्षी विद्यार्थ्यांना लाभदायक वर्ष आहे. यावर्षी परदेशी जाण्याचे योग संभवतात. तसेच नवनवीन संधी शिक्षणात मिळू शकतात, त्या स्वीकारून पुढे जावे लागेल.

आर्थिक जीवन कसे असेल? -

गेल्या वर्षभरात आर्थिक बाजूची चिंता या वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर संपुष्टात येईल. या वर्षी तुम्ही पैसे वाचवण्याचे प्रयत्न कराल आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकेल. अनावश्यक खर्च कसा टाळावा, यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा किंवा पालकांचा सल्ला घेऊ शकता. या राशीचे काही लोक या वर्षी जमीन किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार देखील करू शकतात. परंतु लक्षात ठेवा की गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. एप्रिल ते वर्षअखेरीपर्यंतचा काळ आर्थिक बाजूने सुखद राहील.

आरोग्य कसे असेल? -

कुंभ राशीच्या लोकांवर या वर्षी साडेसातीचा प्रभाव राहील. त्यामुळे या राशीच्या लोकांना आरोग्याच्या काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दुसरीकडे, या वर्षी त्यामुळे तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. प्राणायामचा सराव करावा आणि या वर्षी योग्य आहार घेतल्यास तुम्ही चांगले आरोग्य राखू शकता.

कौटुंबिक जीवन कसे असेल? -

२०२२ मध्ये, गुरु तुमच्या कुटुंबाच्या दुसऱ्या स्थानी प्रवेश करेल. त्यामुळे तुम्ही कौटुंबिक जीवनात शांततेचे क्षण घालवू शकता. या वर्षी वडिलोपार्जित संपत्तीतही वाढ होऊ शकते. या राशीच्या लोकांना शुभ कार्यात भाग घेण्याची संधी देखील मिळेल. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी संबंध वाढू शकतात आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकता. कुटुंबातील सदस्यांमधील तुमची प्रतिमा या वर्षी सुधारू शकते. तुमच्या वाणीच्या दुसऱ्या स्थानी गुरु असेल. त्यामुळे तुमच्या बोलण्याने घरातील लोकांना खूश करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. या राशीच्या लोकांच्या गोड बोलण्यानेही अनेक लोकांच्या तक्रारी दूर होऊ शकतात.

प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असेल? -

कुंभ राशीचे काही लोक या वर्षी आपल्या जोडीदारासाठी एखादे महागडे गिफ्ट घेऊ शकतात. वर्षाच्या सुरुवातीला प्रेम जीवनामध्ये काही अडचणी येऊ शकतात. परंतु एप्रिल महिन्यानंतर तुम्ही तुमच्या प्रियकराशी बोलून प्रत्येक समस्या सोडवू शकाल. या राशीचे लोक जे अविवाहित आहेत. ते बोलण्याने एखाद्यास प्रभावित करू शकता आणि प्रेम जीवन सुरू होऊ शकते. ज्यांचे ब्रेकअप झाले आहे, त्यांना या वर्षी कोणीतरी खास मिळेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले, तर तुमचा जोडीदार तुम्हाला एका चांगल्या मित्राप्रमाणे साथ देईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा पाठिंबा मिळेल. मात्र, या वर्षी जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी.

हेही वाचा - Horoscope 2022 Sagittarius : धनु राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.