ETV Bharat / bharat

दिवाळीच्या प्रकाशात महामारी, आर्थिक मंदीचा अंधकार दूर होवो-सोनिया गांधी - सोनिया गांधी दिवाळी शुभेच्छा न्यूज

सोनिया गांधी यांनी देशातील नागरिक व महिलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना महामारीत महामारीच्या पार्श्वभूमीवर नियम आणि काळजी घेण्याची गरज असल्याचेही काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी न्यूज
सोनिया गांधी न्यूज
author img

By

Published : Nov 14, 2020, 4:29 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी आणि संकट दूर होवो, अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

सोनिया गांधी यांनी देशातील नागरिक व महिलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिव्यांच्या सणात उजळणारे लाखो दिवे भारत आणि आपली मने प्रकाशित करत आहेत. या प्रकाशात महामारी, आर्थिक मंदीचा अंधकार दूर होवो, असे त्यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीत महामारीच्या पार्श्वभूमीवर नियम आणि काळजी घेण्याची गरज असल्याचेही काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. देशात प्रगती, सद्भाव आणि समृद्धी पुन्हा येईल, अशी त्यांनी भावना व्यक्त केली. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान व राष्ट्रपतींनीही दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळीत यावर्षीही सीमेवर भेट दिली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी जवानांसाठी एक दिवा लावण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, दिवाळी हे भारतीय समाजाच्या एकीचे उदाहरण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.