ETV Bharat / bharat

Karnataka Crime News : ऑनर किलिंग! वडील व भावाने अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केली - कर्नाटक क्राइम न्यूज

कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीचे वडील, भाऊ व काकांना अटक केली आहे.

murder
हत्या
author img

By

Published : Jun 16, 2023, 5:56 PM IST

तुमाकुरू (कर्नाटक) : कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यात ऑनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीची तिचे वडील, भाऊ आणि काका यांनी गळा आवळून हत्या केली. 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीचे अनुसूचित जातीतील एका मुलावर प्रेम असल्याच्या कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे.

तीन आरोपींना अटक : तुमकुरुचे एसपी राहुल कुमार शहापूरवाड यांनी शुक्रवारी सांगितले की, या प्रकरणी परशुराम, शिवराजू आणि तुकाराम या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला अनुसूचित जमातीची आहे. ती एका वसतिगृहात वास्तव्यास होती. त्यावेळी ती आणि एक अनुसूचित जातीतील मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडले. मुलगी दोन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला शोधून काढले आणि 9 जून रोजी तिला घरी आणले.

घरच्यांनी मुलीने आत्महत्या केल्याचा दावा केला : मुलीने मुलासोबतचे आपले संबंध संपवण्यास नकार दिल्याने तिच्या घरच्यांनी तिला विष पाजण्यास भाग पाडले. मुलीने त्यांना विरोध केला असता तिचे वडील परशुराम, भाऊ शिवराजू आणि काका तुकाराम यांनी दोरीने गळा आवळून तिचा खून केला. विष घेऊन मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आला.

तपासानंतर सत्य उघडकीस : मात्र, गावकऱ्यांना याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासानंतर सत्य उघडकीस आले. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी पालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पुरावे नष्ट करणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीचा खून करून तिने आत्महत्या केल्याचे पालकांनी भासवले. या संदर्भात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी घटनेचा संशय व्यक्त करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चौकशीत त्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. - राहुल कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक

हे ही वाचा :

  1. Minor Girl Rape : अल्पवयीन युवतीवर 50 वेळा सामूहिक अत्याचार, औरंगाबादच्या बलात्कार प्रकरणात नवीन खुलासा
  2. Amravati Crime News: अमरावतीत 58 वर्षीय व्यक्तीची मजनुगिरी, मुलांना म्हणाला मला तुमची आई पसंत आहे; विनयभंगाचा गुन्हा दाखल
  3. Mumbai Crime News: लोकलमध्येही महिला सुरक्षित नाही! लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला घटनेच्या 8 तासांनंतर अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.