ETV Bharat / bharat

दुसऱ्या धर्मातील तरुणाबरोबर बहिणीचं प्रेमप्रकरण, संतापलेल्या भावानं अल्पवयीन बहिणीची गोळ्या झाडून केली हत्या - कडक चौकशी

Saharanpur Honor Killing : पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एका गावातील मुलीचे एका दुसऱ्या धर्मातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे मुलीचा भाऊ संतापला. या रागातून भावाने लहान बहिणीवर गोळी झाडली.

Honor Killing in Saharanpur
मोठ्या भावानं झाडल्या बहिणीला गोळ्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 11:22 AM IST

Updated : Dec 11, 2023, 11:53 AM IST

एसपी सिटी अभिमन्यू मांगलिक

सहारनपूर : पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी रात्री देहात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखपुरा गावात भावाने घरात झोपलेल्या अल्पवयीन बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली. मुलीचे एका दुसऱ्या धर्मातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे. यामुळे मुलीचा भाऊ संतापला होता. त्यामुळे भावाने हे पाऊल उचलले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मुलगी मुस्कानच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांमध्ये गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. विशेष म्हणजे या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांनाही दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलीच्या आईला ताब्यात घेतले.

कडक चौकशीत बाहेर आले सत्य : पोलीस चौकशीदरम्यान मुलीची आई बबिता हिनं सांगितलं की, तिची मुलगी मुस्कान गोळी लागल्यानं जखमी झाली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता बबितानं सांगितलं की, तिची मुलगी मुस्कानचे त्याच गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे तिचा मोठा मुलगा संतापला होता. त्यानं मुस्कानला अनेकदा समजावले. पण तिनं ऐकलं नाही. म्हणून संतापलेला मोठा मुलगा १८ वर्षीय आदित्यनं मुस्कानची गोळ्या झाडून हत्या केली.

पोलिसांना हॉस्पिटलमधून मिळाली माहिती : एसपी सिटी अभिमन्यू मांगलिक म्हणाले की, मुलीच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. जिल्हा रुग्णालयातून मीमो देहात कोतवाली येथे पोहोचल्यावर मुलीच्या हत्येची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीची आई बबिता हिला ताब्यात घेतले. एसपी सिटी म्हणाले की, कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. मुलीचे वडील डेहराडूनमध्ये काम करतात. ते अद्याप सहारनपूरला पोहोचलेले नाहीत. ते आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. एसपी म्हणाले की, आदित्यला अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

हेही वाचा :

  1. भाजपाला वोट दिलं म्हणून मुस्लिम महिलेला मारहाण, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
  2. टरबूज बिया न दिल्यानं ब्लिंकिट ऑनलाइन कंपनीला आठ हजारांचा दंड
  3. सुखदेव सिंह गोगामेडींच्या हत्या करणाऱ्या दोन शूटर्सला चंदीगडमधून अटक, राजस्थानसह दिल्ली पोलिसांची कारवाई

Last Updated : Dec 11, 2023, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.