ETV Bharat / bharat

गोव्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला गृह मंत्रालयाचा हिरवा कंदील! - permission international tourism in Goa

आंतरराष्ट्रीय पर्यटकांची वाट पाहत असणाऱ्या गोवा राज्याची आता प्रतीक्षा संपली. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने अखेर चॅटर्ड विमाने १५ ऑक्टोबरपासून देशात उतरविण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना ही आनंदाची बातमी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

goa
गोवा पर्यटन
author img

By

Published : Oct 16, 2021, 3:37 AM IST

पणजी- राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असणाऱ्या पर्यटनाला मागच्या महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय पर्यटन सुरू होताच राज्याचे लक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू करण्याच्या परवानगीकडे लागून राहिले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे राज्यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची चॅटर्ड विमाने उतरविण्याची परवानगी मागितली होती. अखेर गृहमंत्रालयाने ही मागणी मान्य करत १५ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय चॅटर्ड विमाने उतरविण्यास परवानगी दिली आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना गुरुवारी ही बातमी देत त्यांनी केलेल्या लसीकरण व पर्यटन सुरू करण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश -

कोविड काळात मागच्या दोन वर्षांपासून राज्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटन बंद होते. मधल्या काळात थोड्याफार प्रमाणात राष्ट्रीय पर्यटकांनी राज्यात हजेरी लावली होती. मात्र राज्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील जनतेचे कोविड लसीकरण पूर्ण करणे गरजेचे होते, म्हणूनच फास्ट ट्रॅकवर लसीकरण मोहीम राबविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत दोन्ही डोस चे १०० टक्के लसीकरण करून राज्य कोविड मुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. शिवाय केंद्राकडे आंतरराष्ट्रीय चॅटर्ड विमाने सूरु करण्याच्या प्रयत्नानाही अखेर यश मिळाले आहे.

निर्णयाचा फायदा निवडणुकांसाठी फायदेशीर -

मागच्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पर्यटन बंद होते, याचा फटका प्रत्यक्षपणे हॉटेल व्यावसायिक, टॅक्सीचालक, रेंट ए होम व स्थानिक बाजारापेठांना बसला होता. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला रोजगार गमवावा लागला होता. मात्र ऐन निवडणुकांच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू होत असल्यामुळे या अनेक समस्या दूर होणार आहेत. मात्र याचा फायदा सत्ताधारी भाजपला होणार आहे. आणि भाजपची याचा पूर्णपणे फायदा घेऊन आपल्या प्रचारात या गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करणार हे मात्र निश्चितच आहे.

हेही वाचा - अमित शहांच्या उपस्थितीत गोवा मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर जोरदार फटकेबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.