नवी दिल्ली: Rajiv Gandhi Foundation: केंद्राने गांधी कुटुंबाशी संबंधित असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशन (आरजीएफ) या गैर-सरकारी संस्थेचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (एफसीआरए) परवाना कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी रद्द केला Home Ministry cancels FCRA licence असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
2020 मध्ये गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयी समितीने याबाबत तपास केला. होय, राजीव गांधी फाऊंडेशनचा एफसीआरए परवाना त्याच्या विरोधात चौकशीनंतर रद्द करण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या RGF च्या अध्यक्षा आहेत तर इतर विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश आहे.
1991 मध्ये स्थापन झालेल्या RGF ने 1991 ते 2009 पर्यंत आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, अपंगत्व समर्थन इत्यादींसह अनेक गंभीर समस्यांवर काम केले. तिच्या वेबसाइटनुसार, शिक्षण क्षेत्रातही काम केले.