ETV Bharat / bharat

नक्षली हल्ला : 'लढाई आता निर्णायक वळणावर, नक्षलवाद मुळापासून संपवणार'

गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. राज्य पोलीस बीजापूर नक्षली हल्ल्याची संपूर्ण रिपोर्ट केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर करणार आहे. नक्षलवाद मुळातून संपवणार आहे. लढाई आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहचली असल्याचे अमित शाह पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अमित शाह
amit shah
author img

By

Published : Apr 5, 2021, 3:33 PM IST

बीजापूर - छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. या हल्लाने पुन्हा एकदा देश हादरला आहे. हल्ल्यानंतर सरकारी पातळीवर वेगाने घडामोडी सुरू झाल्या असून गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. राज्य पोलीस बीजापूर नक्षली हल्ल्याची संपूर्ण रिपोर्ट केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर करणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

नक्षलवाद मुळातून संपवणार आहे. लढाई आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहचली आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मी आश्वस्त करतो, जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अमित शाह म्हणाले. तसेच आज गृहमंत्री बीजापूर येथे झालेल्या चकमकीच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत आणि जखमी जवानांचीही ते भेट घेणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांची नक्षली हल्ल्यावर प्रतिक्रिया

नक्षलवाद्यांनी एका जवानाला ठेवले ओलीस

नक्षलवाद्यांनी एका जवानाला ओलीस ठेवल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित जवान हा जम्मू काश्मीरमधील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांनी जवानाच्या सुटकेच मागणी केली आहे. योग्य वेळ आल्यास आम्ही जवानांना सोडू असे नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. ओलीस ठेवलेल्या जवानाचे नाव राकेश्वर सिंह मनहास आहे. राकेश्वर सिंह मनहास हे कोब्रा बटालियनमध्ये होते. राकेश्वर सिंह मनहास यांना एक वर्षाची मुलगी आहे. गेल्या दहा वर्षांपासून राकेश्वर सुरक्षा दलात आहेत.

कशी झाली चकमक?

सुरक्षा दलाच्या 1 हजार 500 जवानांची एक तुकडी बीजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रात शोधमोहीम राबवत होती. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या बाजूने वांछित माओवादी कमांडर आणि 'पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या बटालियन नंबर एक'चा नेता हिडमा आणि त्याची सहकारी सुजाता यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे 400 नक्षलवादी एकत्र आले होते. यावेळी सुमारे 400 नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांच्या एका तुकडीला घेराव घालत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. तर या चकमकीत 25 हून अधिक नक्षलवादीही ठार झाल्याची सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली.

2013 झीराम घाटी हत्याकांडात याच नक्षलवाद्यांचा होता हात

गेल्या दहा दिवसांपासून सुरक्षा दलांना माद्वी हिदमा या कुख्यात नक्षलवाद्याबाबत माहिती मिळत होती. त्याला पकडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. 2013 मध्ये झालेल्या झीराम घाटी हत्याकांडात या नक्षलवाद्याचा हात होता. या हत्याकांडामध्ये छत्तीसगड काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसह सुमारे 30 लोकांची हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा - ढिसाळ नियोजनामुळे छत्तीसगडमध्ये एवढे जवान हुतात्मा; राहुल गांधींचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.