हैदराबाद : आनंदाचा आणि प्रेमाचा सण म्हणून होळी साजरी करण्यात येते. होळीत आपल्या प्रियजणांसह नातेवाईकांसोबत सगळे आनंदाच्या रंगात रंगून जातात. जसजशी होळी जवळ येते, तसे आपल्या आजूबाजूचे वातावरणही होळीमय होत असते. निसर्गातही होळीचा रंग उधळला जातो. होळीचा सण यावर्षी ८ मार्चला साजरा केल्या जाणार आहे. मात्र त्या अगोदरच होलाष्टक येत आहे. ज्योतीषशास्त्रात होलाष्टकात शुभ कार्य करण्यास मनाई करण्यात येते. यावर्षी होलाष्टक एकूण 9 दिवसांचा असल्याची माहिती ज्योतीषतज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे जाणून घेऊ या होलाष्टक नेमके काय असते, का होलाष्टकात शूभ कार्य करण्यास मनाई असते याबाबत.
काय आहेत होलाष्टकाबाबत समजुती : ज्योतिषशास्त्रानुसार होलाष्टक हा शब्द होळी आणि अष्टक या दोन शब्दांनी बनलेला आहे. अष्टक या शब्दाचा अर्थ आठ असा होतो. म्हणून होळीच्या अगोदर आठ दिवसाच्या कालावधीला होलाष्टक असे म्हणत असल्याचे ज्योतीष्यशास्त्रानुसार संबोधले जाते. विशेषतः उत्तर भारतात होलाष्टक अशुभ मानले जाते. या आठ दिवसात लग्न करणे, घराचे बांधकाम, मुंडण आदी सर्व शुभ कार्ये वर्ज्य करण्यात येतात. पंचांगानुसार होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या अष्टमीपासून सुरू होते. तर त्याचा प्रभाव पौर्णिमेपर्यंत राहत असल्याचे ज्योतीषतज्ज्ञ सांगतात. होलिका दहनाने या होलाष्टकाची समाप्ती होते.
होलिका दहनाची सुरुवात : ज्योतीषशास्त्राच्या मान्यतेनुसार होळीच्या सणाबरोबर होलिका दहनही सुरू होते. होलाष्टकच्या पहिल्याच दिवसापासून ( होलाष्टक दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ ) होलिका दहनासाठी दोन शेणाच्या गौऱ्या तयार केल्या जातात. त्यापैकी एक होलिकेची आणि दुसरी प्रल्हादाचे प्रतीक मानले जाते. दुसरीकडे या वर्षी होलाष्टक अष्टमी तिथीला म्हणजेच सोमवारी 27 फेब्रुवारीपासून सुरू होमार आहे. ती मंगळवार 7 मार्च 2022 फाल्गुन पौर्णिमा होलिका दहनापर्यंत चालणार असल्याची माहिती ज्योतीष्यतज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे इंग्रजी दिनदर्शिकेच्या तारखानुसार या वर्षी होलाष्टक एकूण 09 दिवसांचे असणार आहे.
का होलाष्टकात केले जात नाही शुभ कार्य : धार्मिक श्रद्धेनुसार भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूचे परम भक्त होते. भक्त प्रल्हादाला त्यांच्या हिरण्यकश्यप या राक्षस वडिलांनी होलिका दहनाच्या आठ दिवस आधी अनेक प्रकारचा त्रास दिल्याची अख्यायिका आहे. तेव्हापासून हिंदू धर्मात हा काळ अशुभ मानला जातो. होलाष्टकादरम्यान शुभ कार्य करू नये, विशेषत: नवीन व्यवसाय सुरू करणे, घर बांधणे आदी. या सोबतच या 8 दिवसात केलेल्या कामामुळे लग्नात दु:ख, विभक्त होण्याची शक्यता वाढत असल्याचेही ज्योतीष्य तज्ज्ञ सांगतात.
वैदिक ज्योतिषातही होलाष्टक मानले आहे अशुभ : वैदिक ज्योतिषातही होलाष्टक हे अशुभ मानले गेल्याची माहिती ज्योतिषी उमाशंकर मिश्रा यांनी दिली आहे. या दरम्यान सर्व ग्रह तिथीनुसार उग्र स्वभावात राहत असल्याचे त्यांचे मत आहे. अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहु उग्र स्वभावात राहतो. या आठ ग्रहांच्या अशुभ प्रभावाचा मानवी जीवनावरही वाईट परिणाम होत असल्याचे ज्योतीष्यशास्त्रात नमूद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्या लोकांच्या जन्म कुंडलीत म्हणजेच वृश्चिक राशीत चंद्र दुर्बल आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत सहाव्या किंवा आठव्या भावात चंद्र आहे, त्यांनी या दिवसात अधिक सावध राहण्याची गरज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
Disclaimer : या लेखात दिलेली माहिती ही केवळ ज्योतीष्यशास्त्रावर आधारित आहे. www.etvbharat.com कोणत्याही प्रकारच्या माहितीची पुष्टी करत नाही. किवा कोणत्याही अंधश्रद्धा पसरवतनाही. त्यामुळे कोणतीही माहिती किंवा कार्य करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन ईटीव्ही भारत करत आहे.
हेही वाचा - Holi 2023 : अशी साजरी होते देशातील विविध राज्यांमध्ये होळी, जाणून घ्या खास पद्धती