ETV Bharat / bharat

कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीचा इतिहास - मोदी सीरम कंपनीला भेट

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी १९६६ साली डॉ. सायरस पुनावाला यांनी सुरू केली. मानवाचे जीव वाचविणारी मूलभूत अशी औषधे आणि लस निर्मिती करण्याचा उद्देश पुनावाला यांच्या डोळ्यापुढे होता. आज सीरम कंपनी फार्मा क्षेत्रातील जागतिक स्तरावर आघाडीची कंपनी आहे.

सीरम इन्स्टिट्यूट
सीरम इन्स्टिट्यूट
author img

By

Published : Nov 27, 2020, 6:00 AM IST

Updated : Nov 28, 2020, 3:47 PM IST

पुणे - कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर जगभरातील औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी लस तयार करण्याचा ध्यास घेतला आहे. यात आघाडीवर आहे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय कंपनी. सीरम ही खासगी कंपनी असून पोलीओ, डिप्थेरिया, हिपॅटिटीस - बी, रुबेला, गोवर गालगुंड आणि बीसीजीसह अनेक आजारांवर लस तयार करते. लस निर्मितीतील सीरम आघाडीची कंपनी आहे. कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर सीरमनेही पूर्ण क्षमेतेने संशोधन सुरू केले आहे.

सीरम कंपनीचा इतिहास

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी १९६६ साली डॉ. सायरस पुनावाला यांनी सुरू केली. माणसाचा जीव वाचवणारी मूलभूत अशी औषधे आणि लसी तयार करण्याचा उद्देश पुनावाला यांच्या डोळ्यापुढे होता. १९६० आणि ७० च्या दशकात भारत औषध निर्मिती क्षेत्रात पिछाडीवर होता. अनेक औषधे आणि लसी जास्त किंमत मोजून परदेशातून आयात कराव्या लागत होत्या. त्यामुळे सीरमने सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत औषधे तयार करण्यास सुरुवात केली आणि तेही मोठ्या प्रमाणात. काही दिवसांनी भारत टिटॅनस अँटी-टॉक्सिन आणि साप चावल्यानंतर देण्यात येणाऱ्या लसीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. ही भारतासाठी मोठी आशादायक बाब होती. त्यानंर कंपनीने डीटीपी ही लस तयार केली. त्यानंतर एमएमआर ही लस बनविण्यात यश मिळविले.

बिल्थोवेन कंपनीचा ताबा सीरमकडे

सीरम कंपनीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिल्थोवेन बायोलॉजिकल्स ही कंपनी ताब्यात घेतली. २०१२ साली हा व्यवहार झाला. बिल्थोवेन ही नेदरलँड सरकारच्या मालकीची कंपनी होती. मात्र, तीला सीरमने विकत घेतली. बिल्थोवेन कंपनीची मालकी घेतल्यानंतर पोलीओ लस निर्मितीमध्ये सीरमने मोठी भरारी घेतली. ही कंपनी युरोपात ४० एकरावर उभारलेली होती. दरवर्षी २ कोटी लसींची निर्मिती करण्याची क्षमता या कंपनीची होती. तसेच कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होती. त्याचा सीरमला फायदा झाला. लहान बालकांसाठी लस निर्मिती करण्याची सीरमची क्षमता वाढली. बिल्थोवेन कंपनीचा ताबा घेतल्यानंतर सीरमचा युरोपीयन बाजारपेठेतही प्रवेश सुकर झाला. युरोपात लसींचे उत्पादन करून विक्री सुरू झाली.

जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी आहे. जगभरात लाखो डोस कंपनी वितरित करते. १३० कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस कंपनी जगभरात वितरित करते. त्यात पोलीओ, बीसीजी, हिपॅटिटीस बी, गोवर, रुबेला यांसारख्या लसींचा समावेश आहे. जगातील एकूण बालकांपैकी ६५ टक्के बालकांना सीरम कंपनीने बनविलेली एकतरी लस देण्यात येते, असा अंदाज वर्तवला जातो.

सीरम कंपनीने तयार केलेल्या लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या आहेत. १७० पेक्षा जास्त देशांमधील लसीकरण कार्यक्रमात सीरमने तयार केलेल्या लसींचा वाटा आहे. कंपनीने तयार केलेल्या लसी जागतिक स्तरावर जीवनदायी ठरल्या आहेत. मागील चार दशकांपासून सीरम बेल्थोवेन बायोलॉजिकल्स कंपनीबरोबर मिळून काम करत आहे. दोन्ही कंपन्यांतील तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीमुळे अनेक लसी यशस्वीपणे बनविण्यात आल्या.

नव्या प्रकल्पांवर काम सुरू

डीटीपी लस अत्याधुनिक तंत्रज्ञानासहीत नव्याने विकसीत करण्याचा ध्यास सीरमने घेतला आहे. मुत्रपिंडात बिघाड झाल्याने रक्तातील लाल पेशी कमी होऊन रक्ताशयाचा आजार होता. त्यावर मात करण्यासाठी सीरमकडून लस तयार करण्यात येत आहे. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी नवी लस तयार करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता कोरोनावरील लस तयार कण्यासाठी सीरम प्रयत्नशील आहे.

सीरमची सामाजिक बांधिलकी

औषधे आणि लसीच्या निर्मितीतून सीरमने आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. सोबतच कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी कामे सुरू केली आहेत. 'अदर पुनावाला क्लिन सीटी अभियान' सीरम कंपनीने पुण्यातून सुरू केले आहे. २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचरा, जैवकचरा व्यवस्थापनात कंपनी महानगरपालिकेला मदत करत आहे. शहरातील महत्त्वाचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर विलो पुनावाला मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सीरम कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना स्वस्तात चांगले उपचार मिळावेत हा उद्देश रुग्णालय बनविण्यामागे आहे. या रुग्णालयाला कंपनीकडून मोठी आर्थिक मदत करण्यात येते.

स्वतदरात किंवा मोफत लसींचे वाटप

सीरम कंपनीने देशात आणि परदेशात अनेक वेळा लसी एकतर मोफत किंवा अल्पदरात पुरविल्या आहेत. याचा फायदा अनेक गरीब देशांना झाला आहे. उझबेकिस्तान, नेपाळ आणि अनेक आफ्रिकन देशांना कंपनीने लस पुरविल्या आहेत. स्वाईन फ्लूची लाट आली असता कंपनीने लाखो लसीचे डोस गरीबांना पुरविले. यासोबतच कंपनीने कुष्ठरोग्यांसाठीही मोठे काम केले आहे. कुष्ठरोगी पुनर्वसन केंद्र कंपनीने उभारले असून त्याद्वारे रुग्णांना उपचार दिले जातात. आता कोरोनालसही सर्वांना स्वस्तात आणि सहज उपलब्ध व्हावी म्हणून कंपनी प्रयत्नशील आहे.

Last Updated : Nov 28, 2020, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.