दिसपुर - जर एखादा हिंदू मुलगा हिंदू मुलीशी खोटे बोलत असेल तर तोही जिहाद असल्याचे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी शनिवारी केलं. याविरोधातही लवकरच कॅबिनट कायदा आणले, असेही ते म्हणाले. हिंदुत्व हे 5 हजार वर्ष जुने आणि जगण्याचा मार्ग आहे. बहुतेक धर्मांचे अनुयायी हिंदूंचे वंशज असल्याचेही त्यांनी म्हटलं. आसाममध्ये भाजपाच्या सरकारला दोन महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महिलेची कुणाकडूनही फसवणूक केली गेली. तर सरकार खपवून घेणार नाही. मग ती महिला हिंदू असो वा मुस्लिम. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अशा गुन्हेगारांवर योग्य कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी राज्याती कोरोना परिस्थितीवर भाष्य केले. आसाममध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लसचे एकही प्रकरण आढळणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, ईशान्य राज्यांतील लसीकरण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी 11 वाजता बैठक घेणार आहेत.
शेजारील राज्यांशी असलेल्या सीमा तणावावरही सरमा यांनी भाष्य केले. आसाम-नागालँड आणि आसाम-मिझोरम सीमेवर काही प्रमाणात तणाव आहे. घटनात्मक सीमेचे रक्षण करण्यासाठी आसाम पोलीस तैनात आहेत. ईशान्य भागाचा प्रवेशद्वार असल्याने आम्ही नेहमीच चर्चेसाठी तयार आहोत. मात्र, आम्ही जमिनीवरील अतिक्रमण मान्य करणार नाही, असे ते म्हणाले. यापूर्वी शनिवारी आसामच्या मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राज्य मंत्रिमंडळातील विभागांमध्ये फेरबदल केले.