ETV Bharat / bharat

Hindu Mahasabha on Atiq Murder: अतिकची हत्या करणारे आरोपी वीर, हिंदूंना न्याय मिळवून दिला, हिंदू महासभेकडून समर्थन

हिंदू महासभेने माफिया अतिक अहमद आणि त्याच्या साथीदाराची हत्या करणाऱ्या आरोपींचे समर्थन केले आहे. अतिकचे हत्या करणारे आरोपी हे वीर आहेत. त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला, अशी प्रतिक्रिया हिंदू महासभेच्या प्रवक्त्याने दिली आहे.

HINDU MAHASABHA SPOKESPERSON SHISHIR CHATURVEDI TOLD ATIQ AHMED MURDER ACCUSED AS HEROES
अतिकची हत्या जाणारे आरोपी वीर, हिंदूंना न्याय मिळवून दिला, हिंदू महासभेकडून समर्थन
author img

By

Published : Apr 20, 2023, 4:25 PM IST

हत्या करणाऱ्या आरोपींचे समर्थन

लखनौ (उत्तरप्रदेश): हिंदू महासभेने माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींची तुलना भगवान राम, श्रीकृष्ण आणि भगतसिंग यांच्याशी केली आहे. हिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, 'सनी सिंग, लवलेश तिवारी आणि अरुण हे हिरो आहेत, खलनायक नाहीत. अतिकची हत्या करून त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला आहे, त्यामुळे त्यांचा खटला फुकट लढवायला तयार असल्याचे महासभेच्या प्रवक्त्याने सांगितले.

जनतेला दिला न्याय: प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करणाऱ्या सनी सिंग, लवलेश तिवारी आणि अरुण मौर्य या तीन नेमबाजांची चार दिवसांच्या रिमांडवर एसआयटी चौकशी करत आहे. चौकशीदरम्यान सर्व शूटर्सने स्वतः मोठा माफिया बनवण्यासाठी अतिकला मारल्याचे सांगत आहेत. दरम्यान, हिंदू महासभेने 'या तिन्ही शूटर्सना पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, तर हे तिन्ही शूटर निर्दोष आहेत,' असे विधान केले आहे. आणि त्यांनी प्रयागराजच्या जनतेला न्याय दिला आहे, असेही सांगितले.

..... त्याचप्रमाणे अतिकला मारले: शिशिर चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, 'भगवान रामाने रावणाचा वध केला होता. श्रीकृष्णाने कंशला मारले होते, त्याचप्रमाणे तिन्ही शूटरने अतिक अहमदला मारले आहे. 15 एप्रिल रोजी प्रयागराजमधील शाहगंज पोलिस स्टेशन अंतर्गत कोल्विन हॉस्पिटलमध्ये अतिक अहमद आणि अशरफ यांची तीन शूटर्सनी हत्या केली होती. पोलीस या तिन्ही शूटर्सना रिमांडवर घेऊन हत्येसंबंधी माहिती गोळा करत आहेत. मीडिया आणि पोलिसांनी घेरलेल्या अतिक अहमद आणि अशरफ यांना गोळ्या झाडणारे तीन शूटर कोण आहेत हे जाणून घेऊया.

शूटर नंबर 1: लवलेश तिवारी: अतिक आणि असद यांची हत्या करणारा शूटर लवलेश तिवारी हा बांदा शहरातील कोतवाली क्योत्रा ​​येथील रहिवासी आहे. त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार, लवलेशचे घराशी कोणतेही नाते राहिले नव्हते. वडिलांनी सांगितले की, 'लवलेश चार भावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. लवलेश हा ड्रग्ज व्यसनी असून तो अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असल्याचे वडिलांनी सांगितले.

शूटर नंबर 2: सनी सिंग: अतिक अहमद आणि अशरफ यांना गोळ्या घालणाऱ्या दुसऱ्या शूटरचे नाव सनी सिंग असून तो हमीरपूरचा रहिवासी आहे. शूटर सनीचा भाऊ पिंटू सिंगने सांगितले की, 'सनी काहीच करत नव्हता आणि त्याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत. आम्ही तीन भाऊ असून, आमच्यातील एकाचा मृत्यू झाला. सानी हा असाच हिंडायचा आणि फालतू गोष्टी करत त्यामुळे आम्ही त्याच्यापासून वेगळे राहतो आणि लहानपणीच पळून गेलो.

शूटर नंबर 3: अरुण मौर्या: तिसरा आरोपी अरुण मौर्य असून तो कासगंजमधील सोरॉन पोलीस स्टेशन हद्दीतील बघेला पुख्ता गावचा रहिवासी आहे. अरुणच्या वडिलांचे नाव हिरालाल. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण उर्फ ​​कालिया हा गेल्या 6 वर्षांपासून बाहेर राहत होता. जीआरपी स्टेशनच्या पोलिसाची हत्या केल्यानंतर अरुण फरार झाला होता.

हेही वाचा: अतिक अश्रफ हत्याकांडाच्या चौकशीसाठी तीन पथके दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.