ETV Bharat / bharat

Salman khurshid book controversy : हिंदू आणि हिंदुत्व मधील फरक काय ? राहुल गांधींनी केले हे सूचक विधान.... - ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’

'हिंदू धर्म म्हणजे शीखांना मारणे किंवा मुस्लिमांना मारणे ? हे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? मी उपनिषदे वाचली आहेत पण पाहिली नाहीत. तुम्ही एका निरपराध माणसाला मारले असे कुठे लिहिले आहे ?' असेही राहुल गांधी यांनी मत व्यक्त केले.

Rahul gandhi
Rahul gandhi
author img

By

Published : Nov 12, 2021, 7:16 PM IST

मुंबई - 'हिंदू धर्म आणि हिंदुत्‍व दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते एकच असल्यास त्यांचे नावही एकच असते. असे सूचक विधान राहुल गांधींनी केले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या जन जागरण अभियानात ते बोलत होते. यावेळेस त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व यातील फरक समजावून सांगितला. काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकावरून सध्या मोठा वादंग झाल्यावर राहुल गांधी त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.

  • What is the difference between Hinduism & Hindutva, can they be the same thing? If they're the same thing, why don't they have the same name? They're obviously different things. Is Hinduism about beating a Sikh or a Muslim? Hindutva of course is: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/Hv1GrbM4Lm

    — ANI (@ANI) November 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हिंदू धर्म म्हणजे शीखांना मारणे किंवा मुस्लिमांना मारणे आहे का ? हे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? मी उपनिषदे वाचली आहेत पण पाहिली नाहीत. तुम्ही एका निरपराध माणसाला मारले असे कुठे लिहिले आहे? असाही सवालही त्यांनी केला. खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांसोबत केल्याने भाजप आणि शिवसेनेकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये सलमान खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

  • Today, whether we like it or not the hateful ideology of RSS & BJP has overshadowed the loving, affectionate and nationalistic ideology of Congress Party, we have to accept this. Our ideology is alive, vibrant but it has been overshadowed: Congress leader Rahul Gandhi

    Source:INC pic.twitter.com/qsH2cGH9Xd

'

चीनी कम्‍युनिस्‍ट यांचे उदाहरण देत सांगितला फरक
यावेळेस राहुल गांधी यांनी चिनी कम्युनिस्ट यांचे उदाहरण दिले. एका वेळेस चीनचे नेते आले होते. मी त्यांना विचारले की, तुम्ही कम्युनिस्ट आहात. मग कम्युनिस्ट मध्येही चिनी विचारसरणीचे आहात. तुम्ही सांगा की, तुमच्यात दोन्ही वैशिष्टये असू शकत नाही. जर तुम्ही कम्युनिस्ट आहात तर तुम्हाला कम्युनिस्ट म्हटले पाहिजे. हे खूपच सरळ विचारसरणी आहे. तुम्ही हिंदू असाल तर हिंदू विचारसरणीची गरज काय ? एका नव्या नावाची काही गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

विचारधारेची लढाई महत्त्वाची :

'विचारधारेचा लढा सर्वात महत्त्वाचा झाला आहे. भारतात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेस पक्षाची आणि एक आरएसएसची. देशात भाजप आणि आरएसएसने द्वेष पसरवला आहे. काँग्रेसच्या विचारधारेला बंधुता आणि प्रेमाची जोड दिली आहे. 2014 पूर्वी लढाई विचारधारेवर केंद्रीत नव्हती. पण आजच्या भारतात विचारधारेची लढाई सर्वात महत्त्वाची झाली आहे.

काय आहे प्रकरण ?

सलमान खुर्शिद यांनी Sunrise Over Ayodhya : Nationhood in Our Times या पुस्तकात हिंदुत्वाविषयी टिप्पणी केली आहे. या पुस्तकाच्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची बोको हराम, आयसिसशी तुलना केली आहे. “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे”, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे.

हेही वाचा - सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकामुळे राजकीय वादंग; हिंदुत्वाविरुध्द केले हे वक्तव्य..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.