ETV Bharat / bharat

हिमाचलमध्ये ग्राहक आयोगाने ग्राहकांकडून कॅरीबॅगचे पैसे घेतल्याबद्दल डोमिनोसला दंड ठोठावला - हिमाचलमध्ये डोमिनोसला दंड

हिमाचलच्या राजधानी शिमलामध्ये डोमिनोस पिझ्झा आणि जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेडला 8013 रुपये आणि 33 पैसे दंड वसूल करण्यात आला आहे. या प्रकरणारवर बऱ्यात दिवसांपासू कारवाई सुरू होती.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Sep 15, 2022, 9:43 PM IST

शिमला (हिमाचल प्रदेश) - राजधानीतील प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झा अँड ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडला पिझ्झासह कॅरीबॅगसाठी पैसे मोजावे लागले आहेत. जिल्हा ग्राहक मंचाने दोघांना 8013 रुपये आणि 33 पैसे दंड ठोठावला आहे. अर्थात, दंडाची रक्कम फार मोठी नाही. परंतु, त्याचा ब्रँड मूल्यावर परिणाम झाला आहे. जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डॉ. बलदेव सिंग व सदस्य योगिता दत्ता व जगदेव सिंग रैतिक यांच्या खंडपीठाने हा दंड ठोठावला आहे. आयोगाने 3 वर्षे जुन्या प्रकरणात हा निर्णय दिला आहे.

ही रक्कम तक्रारदाराने भरली होती - त्यांच्याकडून कॅरीबॅगचे पैसे वसूल करण्यात आल्याची तक्रार पियुष व्यास यांनी ग्राहक मंचात केली होती. आयोगाने आपल्या निर्णयात कॅरीबॅगची तक्रार करणाऱ्याला 3 हजार रुपये आणि 33 पैसे खटल्याच्या खर्चासह 5000 रुपये दंड भरण्यास सांगितले आहे. तक्रारीत दिलेल्या तथ्यानुसार, 3 वर्षांपूर्वी 25 डिसेंबर 2019 रोजी तक्रारदाराने 2 पिझ्झाची ऑर्डर दिली होती. तक्रारदाराला पिझ्झा डिलिव्हरी करताना डॉमिनोज आणि जुबिलंट फूडवर्क्सने 1207 रुपये 85 पैसे भरण्यास सांगितले. ही रक्कम तक्रारदाराने भरली होती.

तक्रारदाराच्या युक्तिवादाशी सहमती - तक्रारदाराने ऑर्डर घेतल्यानंतर पाहिले असता कॅरीबॅगमधील पावतीमध्ये 13 रुपये 33 पैसेही टाकण्यात आले होते. याला तक्रारदाराने विरोध केला. वस्तू विक्री कायदा 1935 च्या कलम 36 नुसार, विक्रेत्याची जबाबदारी आहे की तो ज्या पिशवीत वस्तू देत आहे, ती कोणत्याही शुल्काशिवाय दिली जाली. दोन्ही पिझ्झा कागदी कॅरीबॅगमध्ये पॅक केल्यानंतर ते तक्रारदाराला देण्यात आले. तक्रारदाराच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवत आयोगाने वरील निर्णय दि आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.