हिमाचल प्रदेश - भारतीय जनता पक्षाचे दोन वेळेस खासदार असलेलेल रामस्वरुप शर्मा यांचे दिल्ली येथील राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शर्मा यांनी अक्षय शर्मा यांचा पराभव केला होता. ते हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून निवडणूक रिंगणात होते. अक्षय शर्मा हे माजी दूरसंचार मंत्री असलेल्या सुख राम यांचे नातू होय. रामस्वरुप शर्मा हे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचे निकटवर्तीय असून ते राष्ट्रीय सेवा संघाशी संबंधित होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शर्मा यांनी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा सिंग यांच्या विरोधात मोठ्या मताधिक्याने जिंकले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना लस घेतली होती. स्वरुप यांच्या अचानक मृत्यमूमुळे भाजपाने नियोजित बैठक पुढे ढकलली आहे.