ETV Bharat / bharat

AISHE 2020 21 Report : उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा डंका, राज्यात सर्वाधिक पॉलिटेक्निक कॉलेज

केंद्र सरकारने देशातील उच्च शिक्षणाची परिस्थिती सादर करणारा 2021-22 सालचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार देशात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. राज्यात सर्वाधिक महाविद्यालये तर आहेतच. राज्यामध्ये महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे.

AISHE 2020 21 Report
AISHE 2020 21 Report
author img

By

Published : Jan 30, 2023, 8:05 PM IST

नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण AISHE 2020-2021 अहवाल प्रसिद्ध केला आहे. मंत्रालय २०१० सालापासून दरवर्षी उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण (AISHE) सादर करत आहे.

उच्च शिक्षण परिस्थितीची माहिती - या सर्वेक्षणात भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीची संपूर्ण माहिती जमा करुन यामध्ये देण्यात येते. उच्च शिक्षण संस्थांच्यामधील शिक्षक, पायाभूत सुविधा, आर्थिक परिस्थिती याची संपूर्ण माहिती यामधून मिळते.

महाराष्ट्र टॉप 6 राज्यांच्या यादीत - देशात उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी नोंदणीच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप 6 राज्यांच्या यादीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 16.07 टक्के विद्यार्थी नोंदणी झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 10.98 टक्के तर तामिळनाडूमध्ये 8.06 टक्के नोंदणी झाली आहे. महाविद्यालयांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. नावनोंदणीच्या राज्याच्या हिश्श्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यात 10,87,805 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापाठोपाठ तामिळनाडूचा क्रमांक लागतो. तामिळनाडूमध्ये 8,04,384 विद्यार्थ्याची संख्या तर 7,95,516 विद्यार्थ्यांसह दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 734 पॉलिटेक्निक कॉलेज - महाराष्ट्रात सर्वाधिक 734 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. पॉलिटेक्निकमध्ये 13.9 लाख विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये 81% मुले आणि उर्वरित 19% मुली आहेत. नर्सिंगमध्येही देशातील सर्वाधिक नावनोंदणी असलेल्या टॉप 5 राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आहे.

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर - लोकसंख्येच्या प्रमाणात महाविद्यालयांच्या संख्येचा विचार केल्यास उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये 8114 महाविद्यालये आहेत आणि प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे 32 महाविद्यालये आहेत. त्याचप्रमाणे 4532 महाविद्यालयांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 11 प्रकारची 71 विद्यापीठे आहेत.

महाराष्ट्रातील विद्यापीठे - महाराष्ट्रात 35 सामान्य, 4 कृषी, 1 ललित कला, 1 मत्स्यव्यवसाय, 3 कायदा, 7 वैद्यकीय, 4 विज्ञान आणि 8 तांत्रिक विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रात 4532 महाविद्यालयांसह दर लाख लोकसंख्येमागे 34 महाविद्यालये आहेत. विशेष शाखांनुसार 4531 महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 2835 खासगी (विनाअनुदानित), 1162 खासगी (अनुदानित) अशी एकूण 3997 खासगी आणि 534 सरकारी महाविद्यालये आहेत.

खासगी महाविद्यालयांमध्ये 2738849 नोंदणी झाली आहे. तर 304486 विद्यार्थ्यांची शासकीय महाविद्यालयांमध्ये नोंदणी झाली आहे. अशी राज्यात एकूण 3043335 वद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 2017738 विद्यार्थी तर 1718515 विद्यार्थीनी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.