नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने लसीकरणाचे आवाहन करणारी डायलर ट्यून ही त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती विपीन संघी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले, की ही ट्यून कधीपासून वाजत असल्याची माहिती नाही. तुमच्याकडे पुरेशी लस नाही. तरीही लसीकरण करा असल्याचे सांगत आहात. लस नसताना लसीकरण कसे करायचे असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
सरकारने एकच कॉलर ट्यून ठेवण्याऐवजी परिस्थितीनुसार विविध कॉलर ट्यून करण्याची गरज आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. जर लोक वेगवेगळे संदेश ऐकू शकले तर त्यांना मदत होऊ शकेल. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तींची मदत घेतली जाऊ शकते, असा सल्ला दिल्ली उच्च न्यायालयाने दिला.
हेही वाचा- 'लव्ह यू जिंदगी' म्हणाऱ्या तरुणीचा कोरोनाने घेतला बळी; नेटकरी झाले भावूक
लोकांना आहे लशीची प्रतिक्षा-
दिल्ली उच्च न्यायालयाने लशींच्या कमतरेतवरूनही प्रश्न उपस्थित केले. तुम्ही लसीकरण करत नाही. मोठ्या संख्येने लोक लसीकरणाची प्रतिक्षा करत आहेत. तरीही तुम्ही लसीकरण करा, असे सांगत आहात. मागील वेळी हात धुणे आणि मास्क घालणे याची खूप प्रसिद्धी झाली होती. ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि औषधांच्या वापराबाबत ऑडिओ आणि व्हिडिओ प्रसिद्ध करायला हवेत. त्यासाठी टीवी अँकर आणि निर्माते यांच्या मदतीने लहान ओडिओ आणि व्हिडिओ मेसेज तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी काय वेळ घालवित आहात? त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
हेही वाचा- गुजरात : ६ दिवस व्हेटिंलेटरवर राहून झुंज; ४ महिन्यांच्या बालकाची कोरोनावर मात