ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: राहुल गांधींची आजची 'ED' चौकशी संपली; सुमारे 10 तास झाली चौकशी - राहुल गांधी बातमी

नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी ईडीकडून काँग्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची चौकशी सरु आहे. त्यांची आज पाचव्यांदा चौकशी झाली. दरम्यान, त्यांची आज सुमारे 10 तास चौकशी झाली. राहुल गांधी यांनी आज जेवणासाठीही सुट्टी घेतली नाही. राहुल गांधी आज सकाळी सुमारे ११.१५ वाजता ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते.

राहुल गांधींची चौथ्या फेरीच्या चौकशीसाठी आज ईडीसमोर हजेरी

author img

By

Published : Jun 20, 2022, 11:29 AM IST

Updated : Jun 21, 2022, 11:10 PM IST

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी ईडीकडून काँग्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची चौकशी सरु आहे. त्यांची आज पाचव्यांदा चौकशी झाली. दरम्यान, त्यांची आज सुमारे 10 तास चौकशी झाली. राहुल गांधी यांनी आज जेवणासाठीही सुट्टी घेतली नाही. राहुल गांधी आज सकाळी सुमारे ११.१५ वाजता ईडीच्या मुख्यालयात पोहोचले होते.

  • Delhi | Congress leader Rahul Gandhi arrives at Enforcement Directorate (ED) office after a break of half an hour

    He is being questioned for the 5th day in National Herald case. pic.twitter.com/kkBrnJsDtY

    — ANI (@ANI) June 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'अग्निपथ' योजनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हटले की, भारतीय जनता पक्षाचा 'चांगला' अर्थ देशासाठी घातक आहे. त्यांनी ट्विट केले की, 'पंतप्रधान, तुमच्या 'वेळेसह सुधारणा' फायद्यांचा परिणाम म्हणून देशातील जनता दररोज त्रस्त आहे. नोटाबंदी, चुकीचा जीएसटी, सीएए, विक्रमी महागाई, विक्रमी बेरोजगारी, काळे कृषी कायदे आणि आता अग्निपथचा हल्ला असही म्हणाले

राहुल गांधी यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीविरोधात काँग्रेस दिल्लीत आंदोलन सुरू आहे. त्यासाठी छत्तीसगडचे काँग्रेसचे सर्व खासदार-आमदार आणि देशभरातून पदाधिकारी-कार्यकर्ते जंतरमंतरवर पोहोले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय १३ जूनपासून राहुल गांधींची चौकशी करत आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसचे सर्व बडे नेते आणि दिल्लीतील कार्यकर्त्यांनी दिल्लीत निदर्शने केली. यात छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.

  • Delhi | Congress leader Rahul Gandhi reaches the office of the Enforcement Directorate for the fifth day of questioning in the National Herald case pic.twitter.com/MElzQAtaX7

राहुल गांधी हे 13 जून रोजी पहिल्यांदा ईडीसमोर हजर झाले होते. त्यानंतर ते चारवेळा चौकशीसाठी हजर झाले आहेत. राहुल यांची आजपर्यंत एकूण 38 तास चौकशी करण्यात आली आहे. नुकताच राहुल गांधी यांचा 52 वा वाढदिवस झाला. मात्र, राहुल यांची वाढदिवस साजरा करू नका, असे आवाहन केले होते.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED ) राहुल गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या काही खासदारांसह दिल्ली पोलिसांच्या कथित गैरवर्तनाचा आणि अग्निपथ योजनेचा मुद्दा उपस्थित केला. ( Adhir Ranjan Chowdhury ) प्रमुख विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते ( Mallikarjun Kharge ) मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, जयराम रमेश आणि इतर अनेक नेत्यांचा यामध्ये समावेश होता.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी, पी. चिदंबरम, केसी वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.( Rahul Gandhi Questioned ED Fourth Time Today ) यादरम्यान ईडी आणि दिल्ली पोलिसांकडून पक्षाच्या खासदारांसोबत केलेले गैरवर्तन आणि छळवणूक त्यांच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे अशी सुत्रांची माहिती.

  • एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है..@LambaAlka के छलकते आंसू,सिसकना,दर्द,पीड़ा आज के माहौल के बारे बहुत कुछ कह रहे है। pic.twitter.com/3PsizODMsw

    — INC TV (@INC_Television) June 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आमच्या 7 जणांच्या टीमने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि 2 मुद्दे मांडले. अग्निपथ योजनेबाबत आम्ही त्यांना निवेदन दिले असून दुसरे निवेदन काँग्रेसला धमकावण्याचा आणि चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात आहे. ( Agnipath Scheme ) सरकारने कोणालाही न विचारता ही योजना आणल्याचे ते म्हणाले आहेत. या योजनेची कोणाशीही चर्चा झाली नाही. हे आमच्या लोकशाही अधिकारांचे उल्लंघन असल्याचेही आम्ही राष्ट्रपतींना सांगितले अस सांगितले.

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. काँग्रेसच्या निदर्शनात सहभागी होण्यासाठी ते जंतरमंतरवर जात होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांना राजेंद्रनगर येथील निवासस्थानी अडवून नजरकैदेत ठेवले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्ली पोलिसांवर आरोप केले आहेत. "काँग्रेस कार्यकर्ते शांततेत धरणे देत आहेत. असे असतानाही पोलीस त्यांच्यावर हल्ले करत असून त्यांना रोखले जात आहे. ही हुकुमशाही आहे असही गेहलोत म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अग्निपथ योजनेवरून भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजपला 46,000 तरुणांना तयार करून आरएसएसमध्ये आणायचे आहे. वर्षानुवर्षे प्रशिक्षण देऊन त्यांना सोडून द्यावे, असे कोणत्या देशात घडले आहे का? 4 वर्षांचे प्रशिक्षण आणि स्टायपेंड देऊन युवकांना निवडणुकीपर्यंत व्यस्त ठेवण्याचे काम भाजप करत असल्याचे ते म्हणाले. तरुणांनी महागाई आणि बेरोजगारीविरोधात आंदोलन करू नये म्हणून हे केले जात आहे असाही घाणाघात खरगे यांनी केला आहे.

ईडी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात जंतरमंतरवर काँग्रेसचा सत्याग्रह सुरू आहे. काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या सत्याग्रहात सामिल झालेले आहेत. यामध्ये, मल्लिकार्जुन खरगे, सलमान खुर्शीद, के सुरेश, व्ही नारायणस्वामी आणि इतर नेते जंतरमंतरवर सत्याग्रहात सहभागी आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कामगिरी पाहता दिल्लीच्या सर्व सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या निदर्शनात सहभागी होण्यासाठी इतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्तेही येऊ शकतात, अशी भीती पोलिसांना आहे त्यामुळे सुरक्षा वाढली आहे.

  • #WATCH | Delhi: Congress leader Rahul Gandhi arrives at the Enforcement Directorate (ED) office, for questioning in the National Herald case. Today is the fourth day of his questioning by the agency. pic.twitter.com/4XHeiqf8Sr

    — ANI (@ANI) June 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस अध्यक्ष सोनीया गांधी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आजारी आहेत. सध्या त्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारी ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. ( Sonia Gandhi Health ) त्यांनी आपल्या आई सोनीया यांची विचारपूस केली. दरम्यान, ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांनाही 23 जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्या हजर राहतील की नाही याबद्दल तुर्तास काही ठोस माहिती उपलब्ध नाही.

सोनियांची विनंती मान्य - अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले होते की ईडीने राहुल गांधींच्या आई सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी 17 जून ते 20 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती स्वीकारली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी ट्विट केले होते की, "उद्या देशभरातील लाखो काँग्रेस कार्यकर्ते युवकविरोधी अग्निपथ योजना आणि त्यांचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य करणाऱ्या मोदी सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरोधात शांततापूर्ण आंदोलन सुरू ठेवतील.

हेही वाचा - Congress criticizes VK Singh : सेवानिवृत्ती पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात जाणारे आज काय सांगत आहेत

Last Updated : Jun 21, 2022, 11:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.