तिरुवनंतपुरम - केरळमधील कोट्ट्याम जिल्ह्याच्या कोट्टीक्कलमध्ये मोठी भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 13 जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
घर कोसळल्याने दोन मुले जखमी झाले आहेत. भूस्खलन झाल्याने तीन घरे वाहून गेले आहेत. तिरुवनंतपुरम आणि कोझीकोडे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पाण्यात जाऊ नये, असा नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे. केरळ सरकारकडून परिस्थितीवर देखरेख ठेवण्यात येत आहे. एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
हेही वाचा-राहुल गांधींना कशाची भीती वाटते? प्रशांत किशोर यांनी 'हे' दिले उत्तर
केरळच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाच्या घडल्या आहेत. पाठानामथिट्टा, इडुक्की आणि कोट्टायाम जिल्ह्यात भूस्खलनाच्या घडल्या आहेत. शनिवारी सायंकाळी केरळच्या उत्तर भागात मुसळधार वृष्टी होईल, असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा-माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डेंग्युची लागण; प्रकृतीत सुधारणा- एम्स