ETV Bharat / bharat

Heavy Rains In North India : उत्तरेतील राज्यांना पुराने वेढले; 37 नागरिकांचा बळी, लष्कर, एनडीआरएफच्या तुकड्या तैनात - एनडीआरएफच्या तुकड्या

उत्तरेकडील राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत उत्तरेकडील राज्यात 37 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आदी राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy Rains In North India
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 11, 2023, 8:51 AM IST

नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसाने केलेल्या हाहाकाराने तब्बल 37 नागरिकांना आपला जीव गमवाव लागला आहे. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. पावसाने हाहाकार केल्याने मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी परिस्थितीबद्दल बोलून त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत देशाच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

या राज्यात गेले नागरिकांचे बळी : उत्तरेकडील राज्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशात 18, पंजाब आणि हरियाणामध्ये 9, राजस्थानमध्ये 7 आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसात 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील यमुना नदीसह उत्तर भारतातील अनेक नद्यांना उधाण आले आहे. परिसरातील अनेक रस्ते व वस्त्यात गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी वाहने पुरात वाहून गेल्याने नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून आले. रविवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे महापालिका यंत्रणाही परिस्थिती सुधारण्यात हतबल दिसून आली.

बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 39 तुकड्या तैनात : उत्तर भारतातील चार राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या 39 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये एनडीआरएफच्या 14 तुकड्या कार्यरत आहेत. हिमाचल प्रदेशात तब्बल 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडमध्ये 8 आणि हरियाणामध्ये 5 तुकड्या तैनात आहेत. मुसळधार पावसाच्या हाहाकारामुळे राज्य प्राधिकरणांच्या समन्वयाने बचाव कार्य केले जात असल्याची माहिती एनडीआरएफच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. पंजाबमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आल्याने लष्कराने एका खासगी विद्यापीठातील 910 विद्यार्थी आणि इतर 50 जणांची सुटका केली.

  • #WATCH J&K: NHAI is working to construct an emergency bypass at Seri-district Ramban to restore traffic on NH-44.

    (Source: Ramban Deputy Commissioner) pic.twitter.com/zr8tmICsCs

    — ANI (@ANI) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिमल्यात आणखी चार जणांचा मृत्यू : जोरदार अतिवृष्टी झाल्याने हिमाचल प्रदेशातील अनेक भागात भूस्खलन झाले. या भूस्खलनात शिमल्यात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. पहाडी परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी शिमला-कालका महामार्ग ठप्प झाला. राज्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली. गेल्या 50 वर्षांत राज्याने असा मुसळधार पाऊस पाहिला नाही. चंद्रताल आणि लाहौल आणि स्पितीमधील पागल आणि तेलगी नाल्यांमध्ये अडकलेल्या 400 पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बचावकार्यासाठी वेस्टर्न कमांडच्या लष्करी तुकड्या : पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात पूर परिस्थिती मोठी बिकट बनली आहे. पंजाब आणि हरियाणामधील प्रशासनाने बचाव कार्यासाठी लष्कराची मदत मागितली होती. त्यासाठी लष्कराने दोन्ही राज्यातील पूरग्रस्त भागात प्रशासनाला मदत करण्यासाठी वेस्टर्न कमांडच्या तुकड्या पाठवल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अतिवृष्टीने प्रभावित राज्यांमध्ये जीवित आणि वित्तहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडातून या पीडितांना मदत देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

  • "We lost everything...water entered our houses early in the morning around 10-11 am, and we couldn't save any of our belongings. The administration didn't inform us about the evacuation," says a local affected by the flash floods in Himachal Pradesh's Mandi (10.07) pic.twitter.com/svtV4uFF8D

मुसळधार पावसामुळे दिल्लीत पाणी : मुसळदार पावसामुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दिल्लीत पावसाने मोठे नुकसान केले असून दिल्लीच्या रस्त्यावर पाणी साचले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचणे आणि यमुनेच्या वाढत्या पाण्याची पातळी यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत यमुना नदीने 206 मीटरचा टप्पा ओलांडताच सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू होईल, असे स्पष्ट केले. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याची माहितीही अरविंद केजरीवाल यांनी दिली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा : उत्तरेतील राज्यात पाणी तुंबण्याच्या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व विभागांना 'अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर आणि अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी परिस्थिती आणि नद्यांच्या पाण्याची पातळी यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासह त्यांनी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.

  • #WATCH अंबाला (हरियाणा): भारी बारिश के कारण अंबाला-चंडीगढ़ राजमार्ग पर जलभराव हुआ। pic.twitter.com/kAglt1oSeo

    — ANI_HindiNews (@AHindinews) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

  1. weather forecast update today : हिमाचल, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, केरळमध्ये आतापर्यंत 10 हजार नागरिक विस्थापित
  2. Car Drowned In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये जलप्रलय!, पर्यटकांची कार गेली वाहून ; पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.