मोहाली : पंजाबमधील मोहाली परिसरातील कुरळी येथील एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 7 ते 8 जण गंभीर भाजले आहेत. मोहाली, रोपर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दोन शहरांतून रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचलं आहे. पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाच्या दोन डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
5 जणांना वाचवण्यात यश : आगीतून आतापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश आलं असून 6 जणांना मोहालीतील फेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. सध्या यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका पाठवण्यात आल्याचं घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितलं. कारखान्याला लागलेली आग भीषण असल्यामुळं रसायनांचा सतत स्फोट होत आहे.
आग विझवण्याचे प्रयत्न : या घटनेचे वव्हिडिओ समोर आले आहे. पहिला व्हिडिओ अगदी जवळून घेण्यात आला आहे. ज्यामध्ये उंच ज्वालाचे लोट उठताना दिसत आहेत. दुसरा व्हिडिओ दूरवरून शूट करण्यात आला आहे, ज्यामध्ये आगीमुळं काळा धूर आकाशात उठताना दिसत आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आग विझवण्यासाठी अनेक अग्निशमन दलाचे कर्मचारी दोन तासापासून अथक परिश्रम घेत आहेत, मात्र आत्तापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीय.
भिंत तोडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न : अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी बाहेरून पाण्याची फवारणी करत आहेत. वाढत्या तापमानामुळे आजूबाजूच्या कारखान्यांना आगीचा धोका वाढला आहे. त्यामुळे आता भिंत तोडून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन आत पाठवण्याची योजना आखली जात आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक स्फोट झाला. त्यामुळं पाच महिला कर्मचारी भाजल्या. जेव्हा स्फोट झाला एकच धावपळ उडाली. यानंतर अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढलं. त्यांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार करून उपचारासाठी फेज 6 येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
हेही वाचा -