नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि त्यांच्या पत्नींनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. एक मार्चपासून भारतात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यामध्ये साठ वर्षांवरील व्यक्तींना आणि गंभीर आजार असणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.
डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्नी नूतन गोएल यांनी लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर हर्षवर्धन यांनीही लस टोचून घेतली. यावेळी हर्षवर्धन यांनी ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले. या लसीबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नसून, लोकांनी पूर्ण विश्वासाने ही लस टोचून घ्यावी असे ते म्हणाले. तसेच, लस घेतल्यानंतरही कोणाचा मृत्यू झाला असेल, तर तो कोरोनामुळे नाही तर दुसऱ्या गंभीर आजारांमुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना लसीकरणाच्या या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अशा अनेक मोठ्या नेत्यांनीही पहिला डोस घेतला आहे.
हेही वाचा : पश्चिम बंगालच्या सर्व जिल्ह्यांमधून मोदींच्या प्रचारयात्रा; आसामच्या ३३ जिल्ह्यांमध्येही फिरणार..