मुंबई - देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे चिंता मात्र कायम आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस नंतर आता कप्पा व्हेरिएंट समोर आला आहे. राजस्थानमध्ये कप्पा व्हेरिएंटचे आतापर्यंत ११ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे राजस्थानमध्ये खळबळ माजली आहे.
राजस्थानचे आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी सांगितलं की, आतापर्यंत राज्यात कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. यात जयपूर आणि अलवर येथील प्रत्येकी ४-४ रुग्णांचा समावेश आहे. तर दोन रुग्ण बाडमेर आणि एक भीलवाडा येथील आहे.
-
Eleven cases of Kappa variant of COVID-19 have been detected in Rajasthan, says State Health Minister Raghu Sharma
— ANI (@ANI) July 13, 2021 ़ॉ" class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(file photo) pic.twitter.com/vHaZl44ejW
़ॉ">Eleven cases of Kappa variant of COVID-19 have been detected in Rajasthan, says State Health Minister Raghu Sharma
— ANI (@ANI) July 13, 2021
(file photo) pic.twitter.com/vHaZl44ejW
़ॉEleven cases of Kappa variant of COVID-19 have been detected in Rajasthan, says State Health Minister Raghu Sharma
— ANI (@ANI) July 13, 2021
(file photo) pic.twitter.com/vHaZl44ejW
कप्पा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने कमी घातक असल्याचे डॉ. रघु शर्मा यानी सांगितलं. तरी देखील त्यांनी कोविडच्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.
दरम्यान, कोरोनाचा कप्पा व्हेरिएंट (बी.१.१६७.१) भारतात पहिल्यांदा ऑक्टोबर २०२० मध्ये आढळून आला होता. हा कोरोना व्हायरसचा एक डबल म्यूटेंट स्ट्रेन आहे. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत कप्पा व्हेरिएंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये १३ जुलैपर्यंत ९.५३ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहे. मंगळवारी मागील २४ तासात नवे २८ रुग्ण आढळले. आतापर्यंत ९.४३ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८ हजार ९४५ रुग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये झिका विषाणूचे नवे चार रुग्ण
केरळमध्ये मागील आठवड्यात झिका विषाणूचे तब्बल १९ रुग्ण आढळले आहेत. यात २४ वर्षांच्या एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. आता यात आणखी ४ रुग्णांची भर पडली आहे. तिरुवनंतपुरममध्ये सापडलेल्या चार नव्या रुग्णांमध्ये एका १६ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या नव्या रुग्णासह एकूण रुग्णसंख्या २३ वर पोहोचली आहे, याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली.
हेही वाचा - कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन करा, अन्यथा तिसऱ्या लाटेला सामोरे जा- केंद्र सरकार
हेही वाचा - झिका विषाणूचा धोका वाढला; तिरुअनंतपुरममध्ये १६ वर्षीय मुलीसह अन्य तिघांना लागण