लखनौ - उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक अत्याचारप्रकरणी लखनौ येथील खंडपीठात सुनावणी होणार आहे. यापूर्वी २ नोव्हेंबरला याप्रकरणी सुनावणी झाली होती. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आज खंडपीठात आपल्या तपासणीचा अहवाल सादर करणार आहे. न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती राजन राय यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी केली आहे. २ नोव्हेंबरच्या सुनावणीत उच्च न्यायालयात हाथरसचे डीएम प्रवीण कुमार यांच्यावरही टिप्पणी करण्यात आली होती.
४ आरोपींची पॉलिग्राफ टेस्ट -
हाथरसप्रकरणातील ४ आरोपी अलीगढ तुरुगांत शिक्षा भोगत होते. न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने ४ आरोपींची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. गुजरातच्या गांधीनगर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीमध्ये पॉलिग्राफ टेस्ट, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात आले. याप्रकरणी अहवाल सीबीआयला सुपूर्त केला आहे.
सीबीआय स्टेटस रिपोर्ट दाखल करणार -
हाथरस अत्याचारप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. याप्रकरणी पुढील सुनावणीमध्ये स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.