हसन(कर्नाटक) - हसन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यातील तरुणाचे एकाचवेळी दोन तरुणींशी प्रेमसंबंध होते. त्या तरुणींना न कळताच दोघींशी त्याचे प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती त्या दोन्ही तरुणींना काही दिवसांनी समजली. त्यानंतर दोघींनीही लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही स्टोरी आहे. पुढे झाले काय वाचा....
हेही वाचा - राज्यातील मंदिरे बंद; मात्र आरोग्य मंदिरे सुरू.. जनता आशीर्वाद देईल, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
- कर्नाटकामधील सकलेशपूर येथील घटना -
सकलेशपूर तालुक्यातील एका तरुणाचे एकाचवेळी दोन तरुणींशी प्रेमसंबंध सुरू होते. हे तरुणींना समजताच दोघींनीही त्याच्यासोबतच लग्न करण्यासाठी तगादा लावला. हे सगळं पाहून त्यातील एका तरुणीने विष घेत आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता.
- टॉस करण्याचा पंचायतचा ठराव -
हे प्रकरण वाढत असताना तरुण आणि त्या दोन तरुणींचे कुटुंबीयांनी गावात पंचायत बसून याबाबतचा निर्णय घेण्याचे ठरवले. एकाच तरुणासोबत दोन्ही तरुणींनी लग्न करण्याला पंचायतचा नकार होता. त्यामुळे त्यांनी टॉस करण्याचा निर्णय घेतला. ज्या तरुणीच्या नावाने टॉस पडेल त्या तिच्यासोबत तरुणाला लग्न करावे लागेल असा ठराव पंचायतमध्ये झाला. या ठरावावर सर्वांनी सह्यादेखील केल्या होत्या. हे सर्व होईपर्यंत तरुणाने एक शब्दही काढला नाही.
- ...अखेर झाले लग्न -
दरम्यान, टॉस करण्याच्या ठरावानंतर तो तरुण पुढे आला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला त्याने मिठी मारली. तू मला फसवले असे म्हणत त्याचवेळी दुसरी तरुणी पुढे आली आणि त्या तरुणाच्या कानशिलात लगावली. या घडामोडींनंतर अखेर प्रेमासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच तरुणीसोबत त्या तरुणाने लग्नगाठ बांधली.
हेही वाचा - मंत्री अमित देशमुख यांच्या साखर कारखान्याची फसवणूक; 8 कोटी 73 लाख रुपयांचा गंडा