ETV Bharat / bharat

Rishabh Pant Accident : हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर ठरला देवदूत, अशी केली ऋषभ पंतची मदत - ऋषभ पंतच्या कार अपघात

ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर (Rishabh Pant car accident) या घटनेची माहिती सर्वप्रथम पोलिसांना हरियाणा रोडवेजच्या बसचा चालक सुशील कुमार (Haryana Roadways Driver Sushil Kumar) याने दिली. सुशील कुमार याने ऋषभ पंतला घटनास्थळी मदत केली होती. त्याचा फोन आल्यानंतरच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ऋषभ पंतला रुग्णालयात नेण्यात आले. (Haryana Roadways driver helped Rishabh Pant).

Rishabh Pant Accident
ऋषभ पंत कार अपघात
author img

By

Published : Dec 30, 2022, 10:20 PM IST

हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह

डेहराडून : हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर सुशील कुमार क्रिकेटपटू ऋषभ पंतसाठी देवदूत ठरला आहे. आज सकाळी ऋषभ पंतची मर्सिडीज नरसन सीमेजवळ दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. (Rishabh Pant car accident) यानंतर ऋषभ पंतच्या कारला आग लागली. कारची काच फोडून ऋषभ पंतने आपला जीव वाचवला. दरम्यान, समोरून येणारा हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर सुशील कुमार (Haryana Roadways Driver Sushil Kumar) याला जळणारी कार दिसली. त्याने घाईघाईत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चालकाने ऋषभ पंतला जळत्या कारपासून दूर नेले. (rishabh pant after accident)

बस हरिद्वारहून दिल्लीला जात होती : हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, पहाटे 5.22 च्या सुमारास क्रिकेटर ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकल्यानंतर उलटली. त्यानंतर त्यांच्या कारला आग लागली. हरियाणा रोडवेजचा बस चालक सुशील कुमार याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच पंत याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. हरिद्वारचे एसएसपी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला तेव्हा हरियाणा रोडवेजची बस हरिद्वारहून दिल्लीला जात होती. तेव्हा चालकाची नजर रस्त्यावर पडलेल्या भीषण कार अपघातावर पडली. हे पाहून हरियाणा रोडवेजच्या बस चालकाने वाहन बाजूला लावले. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता 112 क्रमांकावर फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकानेच ऋषभ पंतला रुग्णालयात नेले.

पायाला गंभीर दुखापत: ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. तेथून त्याला सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पंतला मॅक्स ऑफ दूनकडे पाठवण्यात आले.

ऋषभ दिल्लीहून रुरकीच्या दिशेने येत होता : शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता. ऋषभ पंतचे घर रुरकी येथे आहे. त्याची कार नरसन शहरात पोहोचली तेव्हा कार अनियंत्रित होऊन रेलिंग आणि खांब तोडून उलटली.

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर : ऋषभ पंतच्या कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकावर कशी आदळली हे फुटेजमध्ये दिसत आहे. यानंतर कारने पेट घेतला. अपघाताचा व्हिडीओ एवढा भीषण आहे की जो पाहतोय तो हादरतोय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.