ETV Bharat / bharat

हार्दिक पटेल भाजपमध्ये दाखल! प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थित झाला प्रवेश - हार्दिक पटेल आज भाजपमध्ये जाणार

काँग्रेस सोडल्यानंतर पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांना भाजपचे सदस्यत्व दिले. यावेळी गुजरातमधील भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

हार्दिक पटेल
हार्दिक पटेल
author img

By

Published : Jun 2, 2022, 10:10 AM IST

Updated : Jun 2, 2022, 1:25 PM IST

अहमदाबाद - गुजरातचे प्रसिद्ध पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी आज गुरुवार (दि. 2 जुन)रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांना भाजपचे सदस्यत्व दिले. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकने कोबा परिसर ते भाजप कार्यालय 'कमलम' असा रोड शो केला, ज्यामध्ये हजारो लोक उपस्थित होते. यानंतर दुपारी 12.39 च्या विजय मुहूर्तावर त्यांनी कमलम येथे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

पुजा पाठ - पक्षात येण्यापूर्वी हार्दिकने एक पोस्टर जारी केले. पोस्टरनुसार भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रमापुर्वी त्यांनी निवासस्थानी दुर्गा पठण केले. दुर्गापूजेनंतर हार्दिक स्वामीनारायण मंदिरात गेले, तेथे त्याने गायीची पूजा केली. दरम्यान, दीर्घकाळापासून काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या हार्दिकने 17 मे रोजी ट्विटरवरून राजीनामा जाहीर केला होता.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिकने एक ट्विट केले होते, त्यामध्ये राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांनी मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन अस त्यामध्ये म्हटले आहे.

  • राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित एवं समाज हित की भावनाओं के साथ आज से नए अध्याय का प्रारंभ करने जा रहा हूँ। भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र भाई मोदी जी के नेतृत्व में चल रहे राष्ट्र सेवा के भगीरथ कार्य में छोटा सा सिपाही बनकर काम करूँगा।

    — Hardik Patel (@HardikPatel_) June 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल - या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत असताना हार्दिक पटेल पक्षात सामील होत आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राज्यात भाजपची सत्ता आहे. (2015) मध्ये, 28 वर्षीय हार्दिक पटेलने पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हिंसक आंदोलन केले. ( Hardik Patel joined BJP ) एकेकाळी भाजपचे कट्टर टीकाकार असलेले पटेल यांच्यावर गुजरातच्या तत्कालीन भाजप सरकारने देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल केले होते.

अनेक गोष्टींवर त्यांनी आक्षेप घेतला - भाजपमध्ये जाणारे हार्दिक पटेल (2019)मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. 11 जुलै 2020 रोजी त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, यावर पटेल यांचे समाधान झाले नाही. राजीनामा देताना त्यांनी पक्षात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. याशिवाय अनेक गोष्टींवर त्यांनी आक्षेप घेतला होता. 18 मे 2022 रोजी त्यांनी काँग्रेसवरील नाराजीमुळे काँग्रेसचा राजीनामा दिला.

बालपणीची मैत्रीण किंजलसोबत लग्न - हार्दिक पटेल हे अहमदाबाद जिल्ह्यातील विरमगाम तालुक्यातील चंदन नगरी गावचे आहेत. या गावात पाटीदार बहुसंख्य लोक राहतात. हार्दिकने पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातूनच केले. त्यानंतर त्यांनी पालक चांगल्या शिक्षणासाठी विरमगाम शहरात राहू लागले. हार्दिकला एक लहान बहीणही आहे. हार्दिक पटेलने गुजरात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अहमदाबादच्या सहजानंद कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. हार्दिक पटेलने त्याची बालपणीची मैत्रीण किंजलसोबत लग्न केले. किंजलचे वडील राज्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत.

एसपीजीसाठी सोशल मीडिया पाहत असे - हार्दिकने उत्तर गुजरातमधील मेहसाणा येथे सरदार पटेल ग्रुप (SPG) नावाच्या सामाजिक संस्थेतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. या संघटनेचे नेते लालजी पटेल होते, ते हार्दिकचे राजकीय गुरूही होते. एसपीजीनेच २०१५ मध्ये पाटीदारांना ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. हार्दिक तेव्हा एसपीजीसाठी सोशल मीडिया पाहत असे.

अनामत आंदोलन समिती - जुलै 2015 मध्ये आरक्षण आंदोलन सुरू झाले. सुरुवातीला गुजरातच्या काही भागात शांततेत मोर्चे काढण्यात आले. मेहसाणा येथील विसनगरमध्ये पाटीदार रॅलीला हिंसक वळण लागल्यावर हे आंदोलन चर्चेत आले. जमावाने भाजप आमदाराच्या कार्यालयाला आग लावली. यानंतर हार्दिक आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. दरम्यान, येथूनच हार्दिक आणि लालजी पटेल यांच्यात मतभेद झाले आणि हार्दिकने आपल्या मित्रांसह पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS) स्थापन केली. जी नंतर पाटीदारांना आरक्षणाची मागणी करणारी प्रमुख संघटना बनली.

हेही वाचा - आरआरआर’ दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाच्या ट्रेलरचे केले कौतुक!

Last Updated : Jun 2, 2022, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.