नवी दिल्ली - पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढत असल्याने केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिले आहे. वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे पुरी यांनी सांगितले.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत इंधनाच्या दरवाढीबाबत लेखी उत्तर दिले. वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय करात कोणतीही वाढ झालेली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. तसेच राज्य सरकारांकडून मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढविण्यात आल्यानेही इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारकडून कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेचले आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता अशा मुद्द्याबाबत विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा-सरकारने पेगाससची खरेदी केली का? हो की नाही एवढेच उत्तर देशाला हवे - राहुल गांधी
आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे इंधनाचे बदलतात दर-
पेट्रोलच्या किमती 26 जून 2010 आणि डिझेलच्या किमती 19 ऑक्टोबर 2014 च्या बाजारावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल मार्केटिंग कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि बाजारातील स्थिती यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत निर्णय घेण्यात येतो. तेल मार्केटिंग कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीप्रमाणे आणि रुपया-डॉलरच्या विनिमय दराप्रमाणे किमती कमी-जास्त केल्या आहेत.
हेही वाचा-नवीन आयटी कायद्याची अंमलबजावणी करा, दिल्ली उच्च न्यायालयाची ट्विटरला अखेरची संधी