ETV Bharat / bharat

Hanumangarh Accident News : ओव्हरटेक करताना कार-ट्रकची धडक, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांवर काळाचा घाला

Big Accident in Rajasthan : राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील नौरंगदेसर इथं भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

Big Accident in Rajasthan
Big Accident in Rajasthan
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 10:17 AM IST

हनुमानगड (राजस्थान) Big Accident in Rajasthan : राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील नौरंगदेसर इथं शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झालाय. यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झालाय. तसंच या घटनेत दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातानंतर ट्रक चालक आपला ट्रक सोडून पळून गेला.

ओव्हरटेकिंगमुळं झाला अपघात : हनुमानगड टाउन पोलीस स्टेशनचे अधिकारी वेदपाल शिवरण यांनी सांगितलं की, नोरंगदेसर गावाजवळ ओव्हरटेक करताना ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत कारचा चक्काचूर होऊन सात जणांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात दोन मुलंही गंभीर जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली, त्यांना उपचारासाठी बिकानेरला पाठवण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच ट्रक चालकाला अटक करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन जखमी उपचाराला बिकानेरला : कारमध्ये 60 वर्षीय परमजीत कौर, तिची दोन मुले 36 वर्षीय रामपाल आणि 25 वर्षीय खुशविंद्र, 35 वर्षीय रीमा पत्नी रामपाल, 22 वर्षीय परमजीत पत्नी खुशविंद्र आणि चार नातवंडे, 5 वर्षीय मुलगा खुशविंद्र, 2 वर्षांचा मनराज मुलगा खुशविंद्र, 14 वर्षांचा रामपालचा मुलगा आकाशदीप आणि 12 वर्षांची रामपालची मुलगी रीत हे प्रवास करत होते. या अपघातात मनराज आणि आकाशदीप यांची प्रकृती गंभीर असल्यानं उपचारासाठी बिकारनेरला पाठवण्यात आलंय.

  • खासदार हनुमान बेनिवाल यांनी व्यक्त केला शोक : नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय. बेनिवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलीय. देव मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होवो, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Navale Bridge Accident : गुजरातला भुसा घेऊन निघालेला ट्रक अपघातानंतर नवले पुलावर पेटला, चार जणांचा होरपळून मृत्यू
  2. Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वरील 12 जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार? अपघातापूर्वी ट्रक थांबवल्याचा व्हिडिओ समोर
  3. Horrific Accident in Chikkaballapur : कर्नाटकात टाटा सुमोचा भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.