वाराणसी : ज्ञानवापी श्रृंगार गौरी प्रकरणात न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली आहे. सोमवारी सकाळी सात वाजतापासून एएसआयची टीम दोन्ही पक्षांसोबत ज्ञानवापी कॅम्पसमध्ये सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करणार आहे. याबाबत आयुक्त अशोक मुथा जैन यांनी रविवारी रात्री त्यांच्या बंगल्यावर दोन्ही पक्षांच्या नागरिकांची बैठक घेतली आहे.
वजू खाना वगळून होणार सर्वेक्षण : सोमवारी सकाळी 7.00 वाजतापासून भारतीय पुरातत्व विभागाची टीम ज्ञानवापी कॅम्पसमधील बॅरिकेडच्या आत सर्वेक्षणाची कारवाई सुरू करणार आहे. याबाबतची माहिती हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन आणि वदिनी सीता साहू यांना फोनवर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलीस आयुक्तांनी दोन्ही पक्षांना एकत्र बैठकीसाठी बोलावले होते. मशिदीच्या आवारातील बॅरिकेटेड भागात वजू खाना वगळता उर्वरित परिसराचे रडार तंत्रज्ञान आणि इतर विविध वैज्ञानिक तंत्रांनी सर्वेक्षण करायचे आहे. याबाबतचे अहवाल 4 ऑगस्टपर्यंत पाठवण्याचे 21 जुलैला न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते. या संदर्भात खांबावर आणि घुमटावर आढळलेल्या खुणांवर रडार तंत्रज्ञानाचा वापर करून या सर्वांची चौकशी करावी, अशा स्पष्ट सूचना एएसआय संचालकांना देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
-
ASI begins survey of Gyanvapi Mosque complex excluding 'Wazukhana' area
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/JjlmbY0U6n#GyanvapiMosque #ASI #Survey pic.twitter.com/poqxZERmuS
">ASI begins survey of Gyanvapi Mosque complex excluding 'Wazukhana' area
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2023
Read @ANI Story | https://t.co/JjlmbY0U6n#GyanvapiMosque #ASI #Survey pic.twitter.com/poqxZERmuSASI begins survey of Gyanvapi Mosque complex excluding 'Wazukhana' area
— ANI Digital (@ani_digital) July 24, 2023
Read @ANI Story | https://t.co/JjlmbY0U6n#GyanvapiMosque #ASI #Survey pic.twitter.com/poqxZERmuS
गरज भासल्यास मातीची होणार तपासणी : गरज भासल्यास मातीची तपासणी करून ती कधीपासून आहे, याचा शोध घ्यावा, अशा सूचनाही संचालकांना मिळाल्या आहेत. बांधकामाची सर्व माहिती न्यायालयाने एएसआय संचालकाकडून अहवालाद्वारे मागवली आहे. 4 ऑगस्टपर्यंत हा अहवाल दाखल करायचा आहे. मशिदीच्या आवारात दररोज शृंगार गौरी आणि इतर देवतांची पूजा करण्याचा अधिकार मागितल्यानंतर ज्ञानवापी वादाला तोंड फुटले. या मूर्ती ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर ठेवण्यात आल्या आहेत. हा वाद 18 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाला. त्यानंतर शृंगार गौरी मंदिरात दररोज पूजा आणि दर्शनाची मागणी करत 5 महिलांनी न्यायालयात धाव घेतली होती. पूर्वी या संकुलात वर्षातून दोनदाच परंपरेनुसार पूजा केली जात असे, मात्र त्यानंतर इतर देवी देवतांच्या पूजेला अडथळा येऊ नये, अशी मागणी या महिलांनी केली.
हेही वाचा -