ETV Bharat / bharat

तुम्हाला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना ताब्यात घ्या - गुरनामसिंग - गुरनामसिंग चढूनी लेटेस्ट न्यूज

गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरू आहेत. यातच शेतकरी सभा घेण्यात येत आहे. एका शेतकरी सभेला संबोधीत करतान भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केले

गुरनामसिंग चढूनी
गुरनामसिंग चढूनी
author img

By

Published : Feb 19, 2021, 5:39 PM IST

हिसार - भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांपैकी जर कोणी दिल्लीला गेले. तर त्याला दिल्लीतच थांबवण्यात येत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडे जाण्याची गरज नाही. दिल्ली पोलीस तुम्हाला अटक करण्यासाठी आले. तर तुम्ही दिल्ली पोलिसांना अटक केली पाहिजे. त्यांना गावातून परत जाऊ देऊ नका, असे गुरनामसिंग म्हणाले.

गुरनामसिंग यांचे भाषण

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फक्त दिल्लीच्या सीमांपुरतेच सीमित न राहता देशभरात पोहोचावे यासाठी भारतीय किसान युनियनने देशव्यापी अभियान सुरू केले आहे. शेतकऱ्यांशी संवाद अभियान राबवण्यात येत आहे.

सिंघू सीमा ही शेतकरी आंदोलनाचे प्रमुख केंद्र आहे. पहिले दोन महिने सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. मात्र, यातील अनेक जण आता घरी गेले आहेत. ट्रॅक्टरची संख्याही कमी झाली आहे. पंजाब, हरयाणासह विविध भागात शेतकरी महापंचायत आयोजित करण्यात येत आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी शेतकरी जात असल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. आंदोलनाचा जोर पहिल्यासारखाच असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार शेतकरी नेत्यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलन -

किसान संयुक्त मोर्चाने बुधवारी देशभरात दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत रेल्वे रोको आवाहन केले होते. किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशात मोठ्या प्रमाणत रेल्वे अडवण्यात आल्या. 26 जानेवारीनंतर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. गेल्या 80 दिवसांपासून शेतकऱ्यांचे मोदी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी राकेश टिकैत गावा-गावत शेतकरी पंचायती घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.