गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाला हा फार मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध नाराजी असल्याचे दिसून येत होते. काही ज्येष्ठ नेत्यांनी ही नाराजी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र अद्याप कोणीही असा राजीनामा दिला नव्हता. आझाद यांच्या राजीनाम्यामुळे अन्यही नेते आपली नाराजी राजीनाम्याच्या स्वरुपात व्यक्त करतील, असे म्हटले जात आहे.