ETV Bharat / bharat

Gujrat Election 2022 : रविंद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा यांना कुटुंबातूच विरोध, जामनगर उत्तर सीटवर लढत अत्यंत चुरशीची

2017 मध्ये ही जागा जिंकल्यानंतर हकुभा जडेजा (dharmendrasinh jadeja hakubha) यांना रुपाणी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. मात्र 2021 मध्ये रुपाणी प्रशासन गेल्यानंतर हकुभा यांना भाजपने पुन्हा उमेदवारी नाकारली. यावेळी पक्षाने प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) यांना या जागेवरून तिकीट दिले आहे.(Jamnagar North Assembly seat)

author img

By

Published : Dec 8, 2022, 10:41 AM IST

Gujrat Election 2022
Gujrat Election 2022

अहमदाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरळीत पार पडल्या. (Gujrat Election 2022). यंदा गुजरातमध्ये मोठ्या संख्येने व्हीआयपी जागा आहेत. जामनगर उत्तर (Jamnagar North Assembly seat) ही यापैकीच एक जागा. येथे धर्मेंद्रसिंह जडेजा (हकुभा) (dharmendrasinh jadeja hakubha) यांच्या जागी भाजपने रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) यांना उमेदवारी दिली आहे. ही या निवडणुकीतील सर्वाधिक वादग्रस्त सीट होती. या जागेवरून जडेजा कुटुंबाचा अंतर्गत कलह निवडणुकीत गाजला होता. (Jamnagar North Assembly seat result).

हकुभा जडेजा यांचाच दबदबा : 2017 मध्ये ही जागा जिंकल्यानंतर हकुभा जडेजा यांना रुपाणी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. मात्र 2021 मध्ये रुपाणी प्रशासन गेल्यानंतर हकुभा यांना भाजपने पुन्हा उमेदवारी नाकारली. यावेळी पक्षाने प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांना या जागेवरून तिकीट दिले आहे. तसे पाहिले तर या जागेवर हकुभा जडेजा यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी एकदा काँग्रेससोबत ही जागा जिंकली होती. 2012 मध्ये नवीन सीमांकनामुळे ही जागा निर्माण झाली. यावेळी या जागेवर 55.96% मतदान झाले आहे. तर 2017 मध्ये येथे 65.50 टक्के मतदान झाले होते.

काट्याची टक्कर : रिवाबा जडेजा यांच्या विरोधात काँग्रेसने जामनगर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बिपेंद्रसिंह जडेजा यांना तिकीट दिले आहे. त्यांनी राजपूत समाजासाठी केले आहे असल्याने त्यांना समाजातही चांगली प्रतिष्ठा आहे. या व्यतिरिक्त ते व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र ते यंदा प्रथमच निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पक्षाने पूर्वाश्रमीचे कुशल भाजप नेते करसन करमूर यांना उमेदवारी दिली आहे. अहिर समाजात त्यांना आदर आहे. विशेष म्हणजे येथे अहिर समाजाची संख्या लक्षणीय आहे. या जागेवर मुस्लिम, लेउवा आणि कडवा पटेल, एससी-एसटी, ब्राह्मण आणि वणिक मतदार आहेत. येथील 13.86% मतदार मुस्लिम, 5.69% अहिर तर 14.92% मतदार अनुसूचित जाती आणि जमातीचे आहेत.

कौटुंबिक कलहामुळे चर्चेत : जेव्हापासून भाजपने रिवाबा जडेजा यांना या जागेसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तेव्हापासून जडेजा कुटुंबातील अंतर्गत कलह चहाट्यावर येतो आहे. रिवाबा जडेजाच्या वहिनी नयनाबा जडेजा कॉंग्रेसच्या सदस्य आहेत. निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्र सिंह जडेजा यांचा प्रचार केला. तर रिवाबा जडेजाचे सासरे अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी मतदारांना आपल्या सुनेला मतदान न करण्याचे आवाहन केले, तेव्हा परिस्थिती आणखी चिघळली.

पंतप्रधानांनी देखील प्रचार केला : भाजपला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जामनगरचा दौरा केला होता. येथे त्यांनी मोठ्या जनसमुदायाशी संवाद साधत मतदारांना भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.