ETV Bharat / bharat

Gujarat Election 2022 : जिग्नेश मेवाणी यांचा विजय, जनतेचे मानले आभार - गुजरात विधानसभा निवडणुकीत

वडगाम विधानसभा जागेवर भाजपचे मणिलाल वाघेला यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी यांचा विजय झाला आहे. शेवटपर्यंत ही लढत अतितटीची सुरू होती.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 8, 2022, 5:05 AM IST

Updated : Dec 8, 2022, 8:50 PM IST

अहमदाबाद : वडगाम विधानसभा जागेवर भाजपचे मणिलाल वाघेला यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी यांचा विजय झाला आहे. शेवटपर्यंत ही लढत अतितटीची सुरू होती. मात्र, अखेर मेवाणी यांनी विजय मिळवला आहे. (Vadgam Assembly seat result) यानंतर मेवाणी यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

यंदा मतदानाची टक्केवारी घसरली : 2022 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र मतदानाची टक्केवारी कमी नोंदवली गेली. यावेळी वडगाम विधानसभेत केवळ 60.16 टक्के मतदान झाले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर 71.2 टक्के मतदान झाले होते. म्हणजेच येथे यंदा तब्बल 10 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने या जागेवरून अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. तेव्हा जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांना 95,497 मते मिळाली होती. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार विजय चक्रवर्ती यांना 75,801 मते मिळाली होती. अशाप्रकारे 2017 मध्ये जिग्नेश मेवाणी यांनी 19,696 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती.

एमआयएमच्या एंट्रीने लढत चुरशीची : या जागेवर काँग्रेसची जिंकण्याची शक्यता असताना ओवेसी यांच्या पक्षाने हिंदू उमेदवार कल्पेश सुंधिया यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिम आणि दलितांचे वर्चस्व असलेल्या या सीटवर ओवेसीच्या प्रवेशाने मेवाणींचा खेळ बिघडू शकतो. जिग्नेश मेवाणी यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी नेते मणिभाई वाघेला (Manilal Vaghela) निवडणूक लढवत आहेत. मणिभाई वाघेला 2012 च्या विधानसभा निवडणुकीत वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मणिभाई वाघेला यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे मणिभाई पक्षावर नाराज होते. आम आदमी पक्षानेही या जागेवर रोहित समाजाचा उमेदवार उभा करून लढत रंजक बनवली आहे.

जातीय समीकरण : जातीय समीकरणाबद्दल बोलायचे झाले तर वडगाम विधानसभा मतदारसंघातील 25.9 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. येथे 15.5 टक्के लोकसंख्या दलित आहे. इतरांपैकी या जागेवर 9.5 ठाकोर, 16.4 चौधरी, 5.6 टक्के राजपूत तर 25.9 इतर जातींचे प्राबल्य आहे. विशेष म्हणजे येथूनच जिग्नेश मेवाणी दलित नेता म्हणून राष्ट्रीय चेहरा म्हणून उदयास आले आहेत. वडगाम विधानसभा मतदारसंघ यावेळीही चर्चेत आला आहे. या जागेवर प्रत्येक राष्ट्रीय स्तरावरील नेत्याने सभा आणि रॅली घेतल्या आहेत. भाजप सरकारचा उघडपणे विरोध करणाऱ्या विपुल चौधरीला अटक केल्यानंतर अर्बुदा सेनेत खळबळ उडाली आहे. त्यामुळे चौधरी समाजाच्या मतांमध्ये तफावत झाल्यास त्याचे नुकसान भाजपलाच होणार आहे.

Last Updated : Dec 8, 2022, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.