जयपूर : गुजरात पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना सोमवारी रात्री उशिरा जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली (Gujarat Police arrested Saket Gokhale) आणि गुजरातला नेले. साकेतवर मोरबी पूल दुर्घटनेबाबत काही आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप आहे (Saket has been accused of posting some offensive tweets regarding the Morbi Bridge incident). त्यामुळे गुजरात पोलीस बराच काळ त्याचा शोध घेत होते.
-
The cooked up case is filed with the Ahmedabad cyber cell about Saket’s tweet on the Morbi bridge collapse.
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) December 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
All this cannot silence @AITCofficial and the Opposition. BJP taking political vendetta to another level. 3/3
">The cooked up case is filed with the Ahmedabad cyber cell about Saket’s tweet on the Morbi bridge collapse.
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) December 6, 2022
All this cannot silence @AITCofficial and the Opposition. BJP taking political vendetta to another level. 3/3The cooked up case is filed with the Ahmedabad cyber cell about Saket’s tweet on the Morbi bridge collapse.
— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) December 6, 2022
All this cannot silence @AITCofficial and the Opposition. BJP taking political vendetta to another level. 3/3
साकेत गोखलेला विमानतळावरून अटक करण्यात आली : साकेत गोखले सोमवारी रात्री दिल्लीहून विमानाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच विमानतळावर आधीच उपस्थित असलेल्या गुजरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. साकेत गोखले याला ताब्यात घेतल्यानंतर गुजरात पोलिसांनी त्याला सोबत घेऊन अहमदाबादला रवाना केले. साकेत गोखले दिल्लीहून जयपूरला येत असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळताच गुजरात पोलिसांनी तत्काळ जयपूर पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर गुजरात पोलिसांनी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून साकेतला ताब्यात घेण्यासाठी जयपूर विमानतळ पोलिस स्टेशनची मदत मागितली. त्यानंतर साकेत गोखलेला विमानतळावरून अटक करण्यात आली. (Gujarat Police arrested Saket Gokhale from jaipur, Gujarat Bridge Collapse)
साकेतने पंतप्रधानांबद्दल काही आक्षेपार्ह ट्विट केले होते : या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेबाबत साकेतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह ट्विट केले होते (Saket had made some offensive tweets about Prime Minister Narendra Modi). तेव्हापासून गुजरात पोलीस साकेतचा शोध घेत होते. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर साकेतने पहाटे 2 वाजता त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला फोन करून गुजरात पोलिसांनी घेऊन गेल्याची माहिती दिली. या घटनेनंतर राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन (erek O'Brien) यांनी ट्विट करून तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केल्याची पुष्टी केली. मोरबी पूल दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू (135 people died in the Morbi bridge disaster) झाला होता. (Gujarat Bridge Collapse)