ETV Bharat / bharat

100 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेली चिमुकली काढली बाहेर, उपचारादरम्यान झाला मृत्यू - रेस्क्यू ऑपरेशन

Dwarka Toddler Dies : गुजरातमधील द्वारका येथे 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यात आलं. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

two and half year old girl rescued from borewell were died in hospital during treatment at dwarka of gujarat
गुजरातच्या द्वारकामध्ये बोअरवेलमधून वाचवण्यात आलेल्या अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 11:27 AM IST

Updated : Jan 2, 2024, 1:05 PM IST

द्वारका Dwarka Toddler Dies : गुजरातमधील द्वारका येथील रान गावात सोमवारी (1 जानेवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास एक अडीच वर्षांची मुलगी खेळत असताना ती 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफच्या मदतीनं चिमुरडीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं.

  • बोअरवेलमध्ये मुलीला ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. तसंच तिला दोरीनं बांधून 15 फूट खेचण्यात आलं. सुमारे 8 तासांच्या अथक परिश्रमानंतर तिला बोअरवेलमधून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. एंजल शाखरा असं या चिमुरडीचं नाव आहे. तिच्या मृत्यूमुळं कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण गावात शोककळा पसरलीय.
  • रेस्क्यू ऑपरेशन : एंजल सोमवारी दुपारी आपल्या घराजवळ खेळत होती. खेळता-खेळता ती तिथं असलेल्या 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. ही बाब लक्षात येताच एंजलला वाचवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले. तसंच यासंदर्भातील माहिती एनडीआरएफ आणि इतर अग्निशमन विभागांना देण्यात आली. ही घटना गांभीर्यानं घेत बचाव पथकासह वैद्यकीय पथकही घटनास्थळी पोहोचले.

उपचारादरम्यान झाला मृत्यू : बचाव कार्यादरम्यान एंजल बोअरवेलमध्ये 25 ते 30 फूट खोलवर अडकल्याचं आढळून आलं. वैद्यकीय पथकाच्या मदतीनं तिला बोअरवेलमध्ये ऑक्सिजन देण्यात आलं. एंजलला वाचवण्यासाठी डिफेंस आणि एसडीआरएफ टीमकडून मदत मागवण्यात आली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्यानं जवळच खड्डा खोदून बचावकार्य करण्यात आले. अखेर 8 तासांच्या अथक परिश्रमानंतर मुलीला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा -

  1. सूरतमध्ये उभारला जगातील सगळ्यात मोठा हिरे बाजार; पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार उद्घाटन
  2. ललित पाटील मागे गुजरात कनेक्शन; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
  3. साईंच्या शिर्डीतील सचिनने फुलवली सीताफळाची बाग; थेट गुजरात राज्यातून सीताफळाला मागणी

Last Updated : Jan 2, 2024, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.