अहमदाबाद - गुजरात सरकारने एप्रिलमध्ये बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे. या निर्णयानंतर बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा परत देण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी बोर्डाने २५५ रुपये शुल्क घेतले होते.
गुजरात सरकारच्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक वर्षेत ७.५० लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. यामध्ये ६० टक्के मुलींचे प्रमाण आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक परीक्षा शुल्क वापस करणे शक्य नसल्याने बोर्डाकडून शाळांना ऑनलाईन पैसे देण्यात येणार आहेत. त्याबाबत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना गुजरात राज्य सरकारने निर्देश दिले आहेत.
हेही वाचा-मध्यप्रदेशात २६ मे रोजी दिसणार अंशत: चंद्रग्रहण
७.५० लाख विद्यार्थ्यांना गुजरात सरकार देणार ६.४७ कोटी रुपये
गुणपत्रिकेची शुल्क ७० रुपये वगळता सुमारे ७.५० लाख विद्यार्थ्यांना गुजरात सरकारला ६.४७ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. विद्यार्थिनींसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात आले नव्हते.
हेही वाचा-ऑलंपिकपटू सुशिल कुमारला दणका..! रेल्वेच्या नोकरीतून केले निलंबित