ETV Bharat / bharat

Gujarat ATS Action : गुजरात एटीएसने आवळल्या चार संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या, एका महिलेचाही समावेश

गुजरात एटीएसने पोरबंदर आणि सूरतमध्ये मोठी कारवाई करत चार संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या संशयित दहशतवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

Gujarat ATS Action
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 10, 2023, 1:28 PM IST

Updated : Jun 10, 2023, 3:27 PM IST

सूरत : गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरच्या समुद्र किनारी मोठी कारवाई चार परदेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चार जणांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे चारही संशयित दहशतवादी इसीस गटाशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसापासून गुजरात एटीएसच्या उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा पोरबंदर आणि सूरतमध्ये तळ ठोकून आहे. एटीएसचे पोलीस महानिरीक्षक दीपन भद्रन यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एटीएसने सुमेरा नावाच्या संशयित महिलेला लालगेट परिसरातून पकडले आहे. सध्या सुमेराला पोरबंदरला नेण्यात आले आहे.

सलग सहा तास सुरू होती चौकशी : एटीएसने सुमेराला पकडल्यानंतर सलग सहा तास तिची चौकशी सुरू होती. तीन वाजता पोलीस सुमेराला घेऊन गेले. एटीएस आणि सूरत गुन्हे शाखेने सुमेराचा बराच शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुमेराचा अडीच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर सुमेरा कुटुंबासह सूरतमध्ये स्थायिक झाली होती.

सुमेरा दोन मुलांची आई : सुमेराच्या कुटुंबात दोन मुले आहेत. यापूर्वी इराणमधून सुमेरा अफगाणिस्तानात जाण्याचा विचार करत होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन ती भारतात किंवा अन्य देशात जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली होती.

सुमेराचा दक्षिणेत विवाह : सुमेराचा विवाह दक्षिण भारतात झाला आहे. सुमेराच्या कुटुंबातील एक सदस्य सरकारी कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात एटीएसने पोरबंदर येथून इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांत या दहशतवादी संघटनेशी संबंधित 3 जणांना ताब्यात घेतले. चौकशीत सुमेराचे नाव समोर आले असून तिच्याकडून आणखी काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. सुमेराकडून चार मोबाईलही सापडले आहेत. ती दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कशी आली? या प्रश्नाचे उत्तर एटीएस शोधत आहे. यासह एटीएसने पोरबंदर येथून 3 संशयितांना अटक केली आहे. एटीएसच्या चौकशीत तिघांनीही सुमेराचे नाव सांगितले आहे.

चार जणांच्या आवळल्या मुसक्या : या प्रकरणी गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरमधून चार संशयितांना अटक केली आहे. या चार जणांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या सर्वांवर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. या संशयितांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी एटीएसच्या पथकाने एक दिवस आधीच त्यांना अटक करण्यासाठी पोरबंदरमध्ये तळ ठोकला होता.

इसीस कनेक्शन : अटक करण्यात आलेले चार जण ISIS गटाचे सदस्य आहेत. याशिवाय छापेमारीत अनेक प्रतिबंधित वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. हे सर्वजण गेल्या वर्षभरापासून एकमेकांच्या संपर्कात होते. याआधी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मध्य प्रदेशात ISIS शी संबंधित तीन जणांना नुकतीच अटक केली होती. सय्यद ममूर अली, मोहम्मद आदिल खान आणि मोहम्मद शाहिद अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

सुमेराला नेले पोरबंदरला : गेल्या वर्षभरात तीन वेळा एनआयएने सूरतमध्ये वेगवेगळ्या संशयितांची चौकशी केली आहे. त्यावेळी कोणालाही अटक झाली नसली तरी सूरत येथून अटक करण्यात आलेल्या सुमेराला एटीएसने पोरबंदरला नेले आहे. तेथे सुमेराची चौकशी करण्यात आली आहे. एटीएसएने दिलेल्या माहितीनुसार, सुमेरा आयएसकेपी या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती.

एटीएसने अशा आवळल्या मुसक्या : एटीएसचे अधिकारी पोरबंदर एसओजी कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथून ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोरबंदर येथून चार परदेशी संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोरबंदरमध्ये एटीएसचे डीआयजी दीपन भद्रन, एसपी सुनील जोशी, डीएसपी केके पटेल, शंकर चौधरी आणि इतर अधिकारी तपासात सहभागी झाले आहेत.

दहशतवादी कनेक्शन : एटीएसचे पथक पोरबंदर आणि आसपासच्या परिसरात दीर्घकाळापासून कारवाईसाठी सक्रिय होते. दहशतवादी संघटनांशी संबंधित विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी गुजरात एटीएसच्या पथकाने द्वारकामध्ये सागरी परिसरात शोध घेतला. त्यानंतर गुरुवारी पहाटेपासून पोरबंदरमध्ये शोध घेण्यात आला.

एटीएसच्या अधिकाऱ्यांना आढळले ड्रग्ज : एटीएसच्या पथकाला सुमेराकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत गुजरात एटीएसकडून आज अधिकृत माहिती दिली जाऊ शकते. अटक करण्यात आलेले परदेशी नागरिक कोण आहेत, ते कोणत्या देशाचे आहेत आणि ते गुजरातमध्ये कधीपासून राहतात? जे त्यांच्यासोबत गुन्हेगारीत संबंधित आहेत. अशा सर्व प्रकरणांबाबत गुजरात एटीएसने अटक केलेल्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र यावेळी ड्रग्ज जप्त करण्यात आले की नाही, याबाबत अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

हेही वाचा -

Hyderabad Crime : विवाहित पुजाऱ्याने प्रेमसंबंधातून प्रेयसीची केली हत्या, जेसीबीने खोदून पोलिसांना शोधला मृतदेह

Last Updated : Jun 10, 2023, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.