ETV Bharat / bharat

Gujarat Elections : गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपला, १ डिसेंबरला होणार मतदान

author img

By

Published : Nov 30, 2022, 9:43 AM IST

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या ( Gujarat Elections ) पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. आता 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान होणार आहे. ( gujarat assembly polls 2022 today last day )

gujarat assembly polls 2022
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

गुजरात ( अहमदाबाद ) : ( Gujarat Elections ) 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी 5 वाजता संपला. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा, नड्डा, आदित्यनाथ आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपच्या प्रचारसभांना संबोधित केले. गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती ( Gujarat Chief Electoral Officer P Bharti ) यांनी सांगितले की, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता संपला. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाईल. केंद्रीय निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. ( gujarat assembly polls 2022 today last day )

गुरुवारी होणार मतदान : पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत, जिथे गुरुवारी मतदान होणार आहे. गुजरातमध्ये परंपरागतपणे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे, परंतु यावेळी विधानसभेच्या एकूण 182 जागांपैकी 181 जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) रूपाने तिसरा पक्ष आहे. तर पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभलिया येथून निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळा आमदार कुंवरजी बावलिया, मोरबीचे 'हिरो' कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा आणि आपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया हेही रिंगणात आहेत.

'आप'चे 88 उमेदवार रिंगणात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यासाठी भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व केले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक भाजप नेत्यांनीही अनेक सभांना संबोधित केले. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेसचे 89-89 उमेदवार आणि 'आप'चे 88 उमेदवार रिंगणात आहेत. सुरत (पूर्व) मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

कम्युनिस्ट पक्षाने दोन उमेदवार रिंगणात : पहिल्या टप्प्यात भाजपने नऊ महिला, काँग्रेसने सहा आणि आपने पाच उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या टप्प्यातील एकूण 788 उमेदवारांपैकी 718 पुरुष आणि 70 महिला उमेदवार आहेत. तर मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने (BSP) पहिल्या टप्प्यात 57 उमेदवार, भारतीय आदिवासी पक्ष (BTP) 14, समाजवादी पक्ष 12, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दोन उमेदवार उतरवले आहेत. याशिवाय 339 अपक्षही रिंगणात आहेत.

मतदारांची नोंदणी : निवडणूक आयोगाच्या मते, पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या भागात एकूण 2,39,76,670 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 1,24,33,362 पुरुष, 1,15,42,811 महिला आणि 497 तृतीय लिंगाच्या मतदारांचा समावेश आहे. गुजरातमध्ये एकूण 4,91,35,400 मतदार नोंदणीकृत आहेत. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 25,434 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यापैकी 9,018 मतदान केंद्रे शहरी भागात आणि 16,416 ग्रामीण भागात स्थापन करण्यात आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.