ETV Bharat / bharat

गुजरात : रस्त्यालगतच्या झोपडीत ट्रक घुसल्याने भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू - Lalabhai Rathod

चालकाने ट्रकमध्ये बदल करून तिचा क्रेनसारखा वापर केला होता. चालकाचे या क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या झोपडीत घुसले. त्यामुळे भीषण अपघात झाला आहे.

अपघात
अपघात
author img

By

Published : Aug 9, 2021, 9:57 AM IST

अहमदाबाद - रस्त्यालगत असलेल्या झोपडीत ट्रक घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात गुजरातमध्ये अमरेली जिल्ह्यात घडला आहे. अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत.

चालकाने ट्रकमध्ये बदल करून तिचा क्रेनसारखा वापर केला होता. चालकाचे या क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या झोपडीत घुसले. या झोपडीत 10 जण झोपले होते, ही माहिती अमरेलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक निरलीप्त राय यांनी दिली. मृतामध्ये 8 आणि 13 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हा ट्रक राजकोटवरून जाफराबादच्या दिशेने जात होता. जखमीमध्ये 3 आणि 7 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

हेही वाचा-पाण्यावरून हवेत तयार झाला 40 फुट उंचीचा भोवरा, पाहा VIDEO

जखमींना अमरेलीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह हे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. पजाबेन सोळंकी (8), लक्ष्मीबेन सोळंकी(30), सुखाबेन सोळंकी(13), हेमराजभाई सोळंकी (37), नरसिंहभाई सानखला (60), नवधनभाई सानखला (65), विरामभाई राठोड(35) आणि लालाभाई राठोड (20) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा-जम्मू काश्मीरमध्ये संशयास्पद अवस्थेत जवानाचा आढळला मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.