ETV Bharat / bharat

पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ ५ दिवसांत मिल्खासिंग यांचे निधन, आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार

गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना मोहालीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, तातडीने त्यांना चंदीगडमध्ये दाखल केले गेले.

महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन
महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन
author img

By

Published : Jun 19, 2021, 1:20 AM IST

Updated : Jun 19, 2021, 2:04 PM IST

नवी दिल्ली- भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना चंदीगड येथे दाखल करण्यात आले होते. त्यांनी शुक्रवारी रात्री 11 .30 वाजता शेवटचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते. त्याच्या परिवारात मुलगा गोल्फर जीव मिल्खा सिंग आणि तीन मुली आहेत. दरम्यान, आज सायंकाळी ५ वाजता चंदीगडच्या सेक्टर २५ स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मिल्खा यांचे विक्रम

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळी भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर धावणे या प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६ सेकंदात पूर्ण केली. १९६२ मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम ५० वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता. २०१० मध्ये दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पूनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला.

धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन
धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल सिंग यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले होते. त्याचे वय ८५ वर्ष होते. कोरोना संसर्गाची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिल्खा सिंग पत्नीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मल सिंग या पंजाब सरकारमध्ये खेळ मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या.

great-runner-milkha-singh-passes-away
पंतप्रधान मोदींचे ट्विट..

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

पंतप्रधान मोदींनी मिल्खा सिंग यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, 'आज आपण एक महान खेळाडू गमावला आहे. मिल्खा सिंग आणि देशाच्या स्वप्नांना मूर्त रूप देत असंख्य भारतीयांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. मी काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्याशी बोललो होतो. हे आमचे शेवटचं संभाषण ठरेल, असं मला वाटलं नव्हतं. मी त्यांच्या कुटुंबीयांसह जगभरातील चाहत्यांसाठी संवेदना व्यक्त करतो.'

मिल्खा सिंग कायम देशवासियांच्या स्मरणात राहतील -

'द फ्लाइंग सिख आणि महान स्प्रींटर श्री मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूल आहे. त्यांनी जागतिक अ‍ॅथलेटिक्सवर अमिट छाप सोडली आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक सर्वात उजळता तारा म्हणून देश नेहमीच त्याची आठवण ठेवेल.' अशा शब्दांत गृहमंत्री अमित शाह यांनी दुःख व्यक्त केले.

मिल्खा सिंग यांची संघर्षगाथा कायम प्रेरणादायी राहील -

मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. त्यांची संघर्षगाथा भारतातील येणाऱ्या अनेक पिढ्यांना सतत प्रेरणा देईल. मी त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आणि प्रशंसकांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भावना व्यक्त केल्या.

Last Updated : Jun 19, 2021, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.