मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरहून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 75 वर्षीय महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेह घेऊन जाण्यास सांगितल्यावर नातवाने घरात लग्न आहे, त्यामुळे मृतदेह नंतर घेऊन जाणार असल्याचे हॉस्पिटलमध्ये लिहून दिले. ब्रेन हॅमरेजमुळे एका 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कार पुढे ढकलून वृद्ध महिलेचा मृतदेह दोन दिवस प्रसिद्ध रुग्णालयाच्या डीप फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाला लेखी हमीपत्रही देण्यात आले. नंतर हा प्रकार मृताच्या संन्यासी मुलाला कळताच त्याने मृतदेह ताब्यात घेऊन आईवर अंत्यसंस्कार केले.
मृतदेह रुग्णालयातच ठेवला : सिसौली येथील रहिवासी नरेंद्र गुप्ता यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती. दरम्यान, नरेंद्र गुप्ता यांची 75 वर्षीय आई कमला यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. 10 जून 2023 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 11 जून रोजी आजी कमला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी गौरव गुप्ता यांनी त्यांचा मृतदेह एका मोठ्या खाजगी रुग्णालयाच्या डीप फ्रीजरमध्ये ठेवला.
नातवाचे रुग्णालयाला लेखी पत्र : नातू गौरव गुप्ता यांनी रुग्णालयाला लिहिले की, 'मी नरेंद्र गुप्ता, गौरव गुप्ता यांचा मुलगा आहे. माझी आजी कमला गुप्ता यांचा मृतदेह इव्हान हॉस्पिटलच्या शवागारात ठेवत आहे. 12 जून 2023 रोजी सकाळी मी मृतदेह घेऊन जाईन कारण आमच्या घरी लग्न आहे. मयत कमला यांचा संन्यासी मुलगा शशीभूषण गोविंद महाराज यांना आईचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवल्याचे समजताच ते 10 रोजी रात्रीच रुग्णालयात गेले. यानंतर ते आईचे पार्थिव घेऊन शुक्रताल येथे गेले आणि त्यानंतर रविवारी अंत्यसंस्कार केले.
हे ही वाचा :