ETV Bharat / bharat

Grandson Demanded Ransom : नातवाने फोनवरून मागितली 1 कोटीची खंडणी, वाचा पुढे काय झाले - पठाणकोट

पठाणकोट येथे एका वृद्धाकडून खंडणी उकळण्याचे प्रकरण उघडकीस आले. (Grandson Demanded Ransom in Pathankot). पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करता धमकी देणारा आरोपी दुसरा कोणी नसून पीडिताचा नातूच होता, असे समोर आले आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण. (grandson demanded Ransom from his grandfather).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 3, 2022, 8:41 PM IST

पठाणकोट (पंजाब) : शाहपूर कंदी पोलिस ठाण्यात एका पीडित्याने पोलिसांकडे तक्रार केली की, एका व्यक्तीने त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. (grandson demanded Ransom from his grandfather). यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आणि काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावला. (Grandson Demanded Ransom in Pathankot).

पीडितेचा नातूच मागत होता खंडणी : पोलिसांनी जलदगतीने पावले उचलत या प्रकरणाची उकल केली आहे. पोलीसांनी पीडिताला ज्या क्रमांकावरून कॉल आला होता त्या नंबरची चौकशी सुरू केली आणि धमकी देणाऱ्या आरोपीला पकडले. धक्कादायक म्हणजे, धमकी देणारा आरोपी दुसरा कोणी नसून पीडिताचा नातूच होता. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

नातवावर यापूर्वीही चोरीचा गुन्हा दाखल : या संदर्भात पोलिसांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना एका तरुणाला अटक केली असून तो पीडिताचा नातू आहे. त्याला अटक करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास शहापूर कंदी पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.