नवी दिल्ली - केंद्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना लसीकरणास सुरूवात झाली.आता 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मित कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी सरकार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
हेही वाचा - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण