ETV Bharat / bharat

देशांतर्गत विमान प्रवास महाग! केंद्राकडून विमान तिकिट दरात 12.5 टक्क्यांची वाढ - विमान तिकिट दरात वाढ

विमान तिकिटांचे किमान दर हे 2,925 ते 8,775 रुपये असणार आहेत. तर विमान तिकिटांचे जास्तीत जास्त दर हे 27,225 ते 89,787.5 रुपये असणार आहेत.

domestic airfare
domestic airfare
author img

By

Published : Aug 13, 2021, 5:31 PM IST

नवी दिल्ली- देशांतर्गत विमान प्रवास करणे आता अधिक महाग झाले आहे. केंद्र सरकारने विमान तिकिटाच्या दराची किमान व कमाल मर्यादा ही 12.5 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे देशात प्रवास करताना नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मे 2020 पासून विमान तिकिटाच्या दरावर मर्यादा लागू केली होती. कोरोनाच्या काळात मर्यादित विमानांचे उड्डाण होण्याकरिता सरकारने विमान तिकिटांच्या दरावर नियंत्रण ठेवले होते. यापूर्वी विमान तिकिटांचे दर कमीत कमी 2,600 ते 7,800 रुपये होते. तर जास्तीत विमान तिकिटांचे दर 8,700 ते 24,200 रुपये होते. ही मर्यादा केंद्र सरकारने वाढविल्याने विमान तिकिटांचे किमान दर हे 2,925 ते 8,775 रुपये असणार आहेत. तर विमान तिकिटांचे जास्तीत जास्त दर हे 27,225 ते 89,787.5 रुपये असणार आहेत.

हेही वाचा-Twitter v/s Congress : प्रियांकासह काँग्रेस नेत्यांनी राहुल यांचा ठेवला फोटो प्रोफाईल; जाणून घ्या काय आहे वाद...

समजून घ्या, अशी होणार विमान तिकिटाच्या दरात वाढ

उदाहरणार्थ प्रवासी जर दिल्लीहून मुंबई मार्गावर विमान प्रवास करत असेल तर त्याला किमान 4,700 रुपयांऐवजी किमान 5287.5 रुपये तिकिटाकरिता द्यावे लागणार आहेत. तर विमान तिकिटासाठी जास्तीत जास्त 13,300 रुपयांऐवजी 14,625 रुपये द्यावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त वाढणाऱ्या तिकीट दरावरील वाढीव करही प्रवाशाला द्यावा लागणार आहे.

हेही वाचा-मुलीसमोर वडीलांना बेदम मारहाण, वडीलांना सोडण्यासाठी चिमुकलीची याचना, VIDEO व्हायरल

केंद्र सरकारने विमान तिकिटाच्या दराची किमान मर्यादा ही मे महिन्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढविली होती. तर फेब्रुवारीमध्ये विमान तिकिटाच्या दराची किमान मर्यादा ही 10 टक्क्यांनी तर जास्तीत जास्त 30 टक्क्यांनी वाढविली होती. मार्चमध्ये विमान तिकिटाच्या दराची किमान आणि कमाल मर्यादा ही 5 टक्क्यांनी वाढविली होती.

हेही वाचा-शिवसेनेला टिकायचं असेल तर भाजपची युती हाच पर्याय - रामदास आठवले

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी 22 जुलैला लोकसभेत विमान तिकिटांच्या दराची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते, की सरकारकडून विमान तिकिटाच्या दराचे नियमन होत नाही. मात्र, कोरोनाच्या काळात सरकारने विमान तिकिटांचे दर निश्चित केले होते. विमान इंधनात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तीनवेळा हे दर बदलल्याचे त्यांनी सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.