ETV Bharat / bharat

भारत बायोटेकच्या अंकलेश्वरमधील उत्पादन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी

कोव्हॅक्सिनचे देशात उत्पादन वाढणार आहे. त्यादृष्टीने देशात नवीन उत्पादन प्रकल्प सुरू होणार आहे.

भारत बायोटेक
भारत बायोटेक
author img

By

Published : Aug 10, 2021, 3:04 PM IST

नवी दिल्ली - देशात लसीकरणाचा वेग वाढविण्याकरिता दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकच्या अंकलेश्वरमधील उत्पादन प्रकल्पाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या उत्पादन प्रकल्पामधून कोरोना लशीचे उत्पादन घेतले जाणार आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून भारत बायोटेकच्या उत्पादन प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की भारत बायोटेकच्या अंकलेश्वर उत्पादनाला मंजुरी दिल्याने कोरोना लशीचे देशातील प्रमाण वाढणार आहे.

हेही वाचा-जातींसंदर्भात माहिती जाहीर करण्याचा प्रस्ताव नाही, सरकारची लोकसभेत माहिती

पंतप्रधानांच्या व्हिजनप्रमाणे लशींची उपलब्धतता वाढणार आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. मनसुख मांडवी यांच्याकडे केमिकल्स आणि फर्टिलायझर्स या दोन्ही विभागांचे मंत्रीपद आहे. भारत बायोटेकने मे महिन्यात अतिरिक्त 200 दशलक्ष डोसचे उत्पादन वाढविण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा-"आम्ही धान लावतो, तुम्ही लस घ्या" शेतकऱ्यांनी लस घ्यावी म्हणून शिक्षकांनी केले शेतात काम!

भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनचे होते उत्पादन

अंकलेश्वर उत्पादन प्रकल्प हा पूर्णपणे किरॉन बेहरिंग या कंपनीच्या मालकीचा आहे. या कंपनीची भारत बायोटेककडे मालकी आहे. भारत बायोटेक ही हैदराबादमधील औषधी कंपनी आहे. भारत बायोटेक ही कोव्हॅक्सिन या कोरोना लशीचे उत्पादन करते.

हेही वाचा-पुरामुळे हानी झालेल्या रस्त्यांबाबत फडणवीस गडकरींना भेटले, अर्थमंत्र्यांना केली 'ही' विनंती

कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी-

भारत बायोटेकने कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकष जाहीर केले आहे. कोव्हॅक्सिन ही कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे. डेल्टा व्हेरियंटविरोधात कोव्हॅक्सिन विरोधात ६५.२ टक्के संरक्षण देत असल्याचेही भारत बायोटेकने म्हटले आहे. कोव्हॅक्सिन ही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तीमध्ये ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे १३० प्रकरणांमधून दिसून आले. तर कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये कोव्हॅक्सिन ही ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून दिसून आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.